खानापुरात केला जातोय आठ दिवसांनी अशुद्ध पाणीपुरवठा:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे थेट बीडीओंना दाखवली
मोर्शी लगतच असलेल्या खानापूर गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मात्र तोही अशुद्ध असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. माजी उपसरपंच संदीप भदाडे यांच्या नेतृत्वात शेकडो गावकरी गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांच्या हजेरीत ग्रामपंचायत कार्यालयात येऊन धडकले. यावेळी त्यांना पाण्याच्या पाईपलाइनमधून निघालेला पक्षी व…