पिंपळदरी परिसरात विहिरींनी गाठला तळ:हंगामी मिरचीचे पीक संकटात, उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई, पिके जगवण्यासाठी धडपड
सिल्लोड तालुक्यात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. मात्र, उन्हाळी हंगामात टोमॅटो, मिरची, कोबी, कोथिंबीर व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सिल्लोड तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला आहे. उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई तीव्र झाली आहे. शेकडो फूट खोल गेलेल्या बोअरवेल आणि विहिरींनी तळ गाठल्याने भाजीपाला पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. ऐन हंगामात लाखो रुपये खर्च करून लागवड केलेल्या…