पुण्यात भरधाव मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू:एनडीए रस्ता, संगमवाडी परिसरात दोन अपघात
पुणे शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. एनडीए रस्ता आणि संगमवाडी परिसरात या घटना घडल्या. भरधाव मोटारींच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणांचा बळी गेला असून, दोन्ही प्रकरणांमध्ये मोटारचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एनडीए रस्त्यावर घडलेल्या पहिल्या घटनेत, राजू नारायण चव्हाण (वय 31, रा. कोंढवे-धावडे, एनडीए रस्ता) या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. कामावरून घरी परतत…