Headlines

पश्चिम बंगालचा विजय सरळ मार्गाने नाही मिळवला:संजय राऊत यांची भाजपवर टीका, म्हणाले- दिवा विझताना मोठा होत असतो

आज पश्चिमन बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. तर केरळमध्ये कॉंग्रेसला अधिक मत मिळतंय दिसत आहे. या सगळ्या परिस्थितीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पश्चिम बंगालचा विजय हा सरळ मार्गाने मिळवलेला नसल्याची टीका राऊत यांनी केली आहे. संजय…

Read More

ओमानच्या शिष्टमंडळाची सिंबायोसिसला भेट:भारत-ओमान संबंधांना नवी गती देण्यावर भर

ओमान केवळ गुंतवणुकीच्या शोधात नसून, शिक्षण, संस्कृती आणि नवोपक्रम या क्षेत्रांत समान मूल्ये निर्माण करू शकतील अशा अर्थपूर्ण भागीदारीसाठी उत्सुक आहे, असे प्रतिपादन ओमानच्या वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्रालयाचे परकीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य सल्लागार पंकज खिमजी यांनी केले. ओमानच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सिंबायोसिसला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. या शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी सिंबायोसिसचे संस्थापक…

Read More

मोदींनी ममतांना पराभवाची झालमुडी चाखवली:बंगाली जनतेने खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित केली; शिंदेंनी केले मोदी – शहांचे कौतुक

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पश्चिम बंगालमधील विजयाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे. आज भाजपसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण, आज पहिल्यांदाच बंगालमध्ये कमळ उमलले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपने ममता बॅनर्जी यांना पराभवाची झालमुडी खाऊ घातली, असे ते म्हणालेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा…

Read More

भाजपला पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरीत यश:पुणे कार्यालयात भारत मातेचे पूजन करून आनंद व्यक्त

भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानिमित्त पुणे शहर भाजपने आनंद व्यक्त केला. शहर कार्यालयात भारत मातेचे पूजन करून हा विजय साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये अनेक…

Read More

तरुणाची १५ लाखांची फसवणूक:हडपसर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल, तपास सुरू

पुण्यात सायबर चोरट्यांनी एका तरुणाची १५ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन गुंतवणुकीत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली आहे. १३ फेब्रुवारी रोजी…

Read More

7.50% पेक्षा कमी व्याजावर गृहकर्ज मिळत आहे:बँक ऑफ इंडिया 7.10% व्याज दराने कर्ज देत आहे, 5 बँकांचे व्याजदर पहा

या दिवसांत जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला देशातील प्रमुख बँकांच्या व्याजदरांची माहिती असणे आवश्यक आहे. बँक ऑफ इंडियामध्ये गृहकर्जाचा व्याजदर 7.80% पासून सुरू होत आहे. तर एसबीआयचा व्याजदर 7.25% पासून सुरू आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल, तर त्याआधी तुम्हाला हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे…

Read More

मेधा कुलकर्णी संसदेत मांडणार 'कॉर्पोरेट जिहाद' मुद्दा:कंपन्यांसाठी नियम-अटी करणार; 'लव्ह जिहाद' विरोधात अभियानास प्रारंभ

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ‘कॉर्पोरेट जिहाद’चा मुद्दा आगामी संसदेत मांडणार असल्याचे सांगितले. कॉर्पोरेट आस्थापनांमध्ये वाढता जिहाद रोखण्यासाठी भारतात येण्यापूर्वीच त्यांच्यावर नियम-अटी लागू करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्यात ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियानाचा प्रारंभ झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. कुलकर्णी…

Read More

तरुणाच्या डोक्यात अडकला कोयता:जखमी तरुण स्वतः मुंबईतील सायन रुग्णालयात चालत आला; पाहा घटनेचा भयंकर VIDEO

मुंबई शहरातील वाढत्या गुन्हेगारीची झलक दाखवणारी एक धक्कादायक घटना सायन परिसरात समोर आली आहे. त्यात एक तरुण डोक्यात धारदार कोयता अडकल्याच्या स्थितीत स्वतःच रुग्णालयात चालत आल्याचे दिसून येत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, यामुळे नागरिकांत भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचा काही व्यक्तींशी वाद झाला…

Read More

ज्येष्ठांवर सायबर धोका, हे 5 उपाय करतील सुरक्षा:स्कॅमर्सच्या भावनिक दबावाखाली येऊ नका, कॉल आल्यास कुटुंबीय किंवा तज्ञांना सांगा

छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये काही दिवसांपूर्वीच एका निवृत्त महिला प्राध्यापिकेला ठगांनी 7 दिवस घरात डिजिटल अटक करून ठेवले. टेरर फंडिंगची भीती दाखवून 1.4 कोटी रुपये लुटले. हा एकटाच प्रकार नाही; देशात डिजिटल फसवणुकीचे बळी ठरलेल्यांमध्ये 60% पेक्षा जास्त वृद्ध आणि निवृत्त कर्मचारी आहेत. इकडे, ठग आता ओटीपी किंवा वीज बिलासारख्या फसवणुकीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, ते टेरर फंडिंग,…

Read More

विजयचे लेडी लक, जिच्या वाढदिवशी निवडणूक जिंकली:तामिळनाडूचा निकाल येताच तृषा विजयच्या घरी पोहोचली, अभिनेत्याचा घटस्फोट झाला आहे

अभिनेता थलापती विजयने तमिळ राजकारणात नायकासारखी एन्ट्री केली आहे. त्याच्या TVK पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 110 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. आता त्यांचे मुख्यमंत्री होणे निश्चित आहे. TVK च्या विजयात विजयच्या ‘लेडी लक’ला महत्त्वाचे मानले जात आहे. आज त्याच ‘लेडी लक’ अभिनेत्री तृषा कृष्णनचा वाढदिवस आहे, जिचे नाव विजयशी जोडले गेले आहे. तामिळनाडू निवडणुकीचा निकाल…

Read More