पोटच्या गतिमंद मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचार:गुंगीच्या गोळ्या देत 10 वर्षांपासून करत होता छळ, हिंगोलीत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
हिंगोली जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. नोकरीच्या निमित्ताने हिंगोलीत राहणाऱ्या एका निवृत्त जिल्हा परिषद शिक्षकानेच स्वतःच्या गतिमंद आणि अल्पवयीन मुलीवर तब्बल 10 वर्षे वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम वडिलाविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…