Headlines

विधान परिषद निवडणूक:आज सकाळी दहाला निकाल

विधान परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतांच्या मोजणीला सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. केवळ ६१४ मतांची मोजणी असल्याने अवघ्या दोन तासांतच त्याची प्रक्रिया संपेल. सकाळी दहा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. नियोजन भवनात होणाऱ्या या मतमोजणीसाठी महसूल व पोलिस प्रशासनाची टीम सज्ज झाली आहे. संपूर्ण मतमोजणी केवळ दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे….

Read More

52 वर्षीय महिलेचा विनयभंग:एका महिलेसह तिघांवर गुन्हा

मुलीबरोबर बोलण्याच्या व फोटो काढण्याच्या कारणावरून ५२ वर्षीय महिलेस अश्लील बोलून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी तिघांवर सलगर वस्ती पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जितेश शशिकांत जाधव, सनी जाधव व अनिता जाधव (सर्व रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक- ३) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी महिला…

Read More

ताणतणाव घालवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेडिटेशन करावे:बबनराव धावणे यांचे आवाहन, इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी केला आसनांचा सराव

भारताने योग अभ्यासाच्या रूपाने जगाला एक अनमोल देणगी दिली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव सहन करण्याची शक्ती कमी झाल्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी मनाला शांत करण्यासाठी योगासने करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मानसिक स्थैर्यासाठी नियमित मेडिटेशन (ध्यान) करावे, असे आवाहन माजी क्रीडाशिक्षक बबनराव धावणे यांनी केले….

Read More

अहिल्यानगरमध्ये 2 हजारांवर नागरिकांच्या उपस्थितीत शहरात योग दिन साजरा:सावेडी येथील जॉगिंग पार्कमध्ये रंगला योगमय सोहळा

जिल्हा प्रशासन, मनपा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा भारती, विविध योग संस्था आणि एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी सावेडी येथील जॉगिंग पार्कच्या मैदानावर हा योगमय सोहळा पार पडला. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते व महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन…

Read More

अकोले आगार राज्यात प्रथम; पण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पायपीट कायम:"जेथे उत्पन्न, तेथेच बस'' धोरणाने आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात‎

आदिवासीबहुल अकोले तालुक्यातील एसटी आगाराने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘क’ वर्ग गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र, या प्रथम पारितोषिकाच्या आनंदावर तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील दळणवळणाच्या विदारक वास्तवाने विरजण पाडले आहे. “जेथे उत्पन्न, तेथेच बससेवा’ हे ब्रीद घेऊन अकोले आगाराचा कारभार सुरू असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे हाल गेल्या अनेक महिन्यांपासून…

Read More

मुळा धरणावरील विद्युत मोटारी दिवसाआड दोन तास सुरू राहणार:पिण्याचे पाणी व जनावरांच्या गरजा भागवण्यासाठी प्रशासनाची परवानगी‎

राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील पाणीसाठा खालावल्याने आणि पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने धरण प्रशासनाने धरणावरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आमदार अक्षय कर्डिले यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा…

Read More

पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याच्या पावसाळी पर्यटनाला ‘ब्रेक’‎:निसर्गप्रेमींसह व्यावसायिकही पावसाच्या प्रतिक्षेत, ट्रेकिंगमध्ये 30 ते 40 टक्के घट‎

निसर्गाचे अप्रतिम रूप आणि अथांग जलाशयांचे वैभव लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाला यंदा पावसाने दडी मारल्यामुळे ब्रेक लागला आहे. जून महिना संपत आला तरी वरुणराजाची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे दरवर्षी हिरवी शाल पांघरणारे डोंगर अजूनही कोरडेच आहेत. तर धबधबे वाहते झालेले नाहीत. त्यामुळे पर्यटकांनी गजबजणाऱ्या निसर्गरम्य कडेकपारी आणि गडकिल्ले सध्या ओस पडले आहेत. नेहमी जूनच्या…

Read More

प्रवाशांच्या जिवाशी खेळ : नगर-मनमाड मार्गावर महिन्याभरातच पुलाला भगदाड:ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान असलेल्या एमआयडीसी परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला महिनाभरातच मोठे भगदाड पडल्याची घटना समोर आली. या प्रकारामुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या महामार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. अवजड वाहतुकीचा भार सहन…

Read More

ताशी 250KM वेगाने BMW ची डिव्हायडरला धडक, 2 ठार:कारचे इंजिन 30 मीटर दूर जाऊन पडले, बर्थडे पार्टी साजरी करून परत येत होते

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेवर भरधाव वेगाने जाणारी बीएमडब्ल्यू कार दुभाजकाला धडकली. यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर कार चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तिचे इंजिन अपघाताच्या ठिकाणापासून तब्बल 30 मीटर दूर फेकले गेले. मृतांपैकी एकाच्या सोशल मीडिया पोस्टची पोलीस चौकशी करत आहेत….

Read More

मान्सूनला दृष्ट लागली:इतिहासातील दुसरा सर्वात कोरडा जून संपत आला, जून 2009 मध्ये सरासरीपेक्षा 49 %, तर यंदा जूनमध्ये 42.2% तूट

नैऋत्य मान्सून दोन आठवड्यांनंतर आता पुढे सरकू शकतो. बंगालच्या उपसागरात एक हवामान प्रणाली तयार झाली आहे, जी मान्सूनला महाराष्ट्रात पुढील वाटचालीस अनुकूल ठरेल. याचा वेग चांगला राहिला तर येत्या २ ते ३ दिवसात मुंबईत मान्सूनचा पाऊस पडू शकेल. दरम्यान, पावसाच्या नोंदीच्या १२६ वर्षांच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात कोरडा जून महिना संपत आहे. यापूर्वी २००९ मध्ये…

Read More