दादा भुसे- अद्वय हिरे शेतकी संघात आमने-सामने:भुसेंचे शेतकरी विकास व हिरेंच्या जनशक्ती पॅनलमध्ये लढत; आज निकाल
मालेगाव शेतकी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. २१) उत्साहात व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. या निमित्ताने मंत्री दादा भुसे व अद्वय हिरे हे प्रतिस्पर्धी पुन्हा आमने-सामने आले आहेत. संघाच्या १५ जागांसाठी एकूण १ हजार ३९५ मतदारांपैकी १ हजार १८६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावल्याने सुमारे ८५ टक्के मतदानाची नोंद झाली. आज, सोमवारी (दि. २२) येथील…