वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळीचे नुकसान:बळीराजा संकटात, पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव येथे फटका
तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव आदी परिसरातील केळी बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीसाठी तयार असलेल्या केळीच्या झाडांवर वादळी वाऱ्याने कहर…