Headlines

सरासरीच्या 26% पाऊस:राज्यात 15 जूनपर्यंत 103 मिमी अपेक्षित, पण 27 मिमीच पाऊस, पेरणीची घाई नक, सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेल्या पीक परिस्थितीच्या आढाव्यानुसार, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात सरासरीच्या केवळ 26 टक्के पाऊस झाला. राज्यात 1 ते 15 जूनपर्यंत 103 मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात फक्त 27.4 मिमी पाऊस झाला. यामुळे सरकारने शेतकऱ्यांना पिकांच्या पेरणीची “घाई न करण्याचा’ सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच मुंबईत जूनच्या पहिल्या दिवसात…

Read More

संभाजीनगरात तिरंगी लढत:विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान; 31 उमेदवार, 7043 मतदार, ईव्हीएम नव्हे, मतपत्रिकेचा वापर

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधान परिषदेवर निवडल्या जाणाऱ्या आमदारांसाठी गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होत आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. मात्र, त्यातील अहिल्यानगर, ठाणे, यवतमाळ, पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या ६ जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, भंडारा-गोंदिया, धाराशिव-लातूर-बीड,…

Read More

उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर सहा खासदार दिल्लीत दाखल:आज लोकसभा अध्यक्षांना भेटणार, उपमुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत

महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 नंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. कारण उद्धवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ते बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र देऊ शकतात. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले. सूत्रांनी सांगितले की, बुधवारी सकाळी आधी शिंदेंची या खासदारांसोबत बैठक होईल….

Read More

मोदींनी होर्मुझमधील भारतीयांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला:म्हणाले – खलाशांची सुरक्षा आमची जबाबदारी; G-7 परिषदेच्या आउटरीच सत्रात ट्रम्पही होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G-7 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी होर्मुझ सामुद्रधुनीतील भारतीयांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. आउटरीच सत्रात मोदी म्हणाले – अनेक भारतीय नागरिकांनीही आपले प्राण गमावले आहेत. जागतिक सागरी व्यापाराद्वारे देशांना जोडणाऱ्या खलाशांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. मोदी म्हणाले की, आम्ही पश्चिम आशियामध्ये शांततेच्या दिशेने झालेल्या प्रगतीचे स्वागत करतो….

Read More

संभाजीनगरात टोळी गजाआड; 10 तोळे सोने, 4 दुचाकी जप्त:दुचाकी चालवता येत नसल्याने मंगळसूत्र चोराने ‘60-40’ वाट्याने नेमला रायडर

शहरात मॉर्निंग वॉक, रात्रीचा फेरफटका मारणाऱ्या किंवा मंदिरात जाणाऱ्या वृद्ध महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या कुख्यात अमोल गलाटे टोळीच्या गुन्हे शाखेने अखेर मुसक्या आवळल्या. या टोळीचा मुख्य सूत्रधार अमोल गलाटे याला दुचाकी चालवता येत नसल्याने त्याने चक्क ६०-४० टक्क्यांच्या वाटणीवर २ रायडर गुन्ह्यांसाठी सोबत ठेवले होते. चोरीच्या सवयीमुळे स्वतःच्या घरच्यांनीही घरातून हाकलून दिल्यानंतरही या…

Read More

दिव्य मराठी एक्सपाेज:17 तलावांचा गाळ कागदोपत्री काढून 5.32 कोटी रुपये हडपले, धाराशिवला गाळमुक्त धरण योजनेत घोटाळा

धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील 17 पाझर तलावांतून गाळ उपसा न करताच बोगस कागदपत्रे तयार करुन गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून 5 कोटी 31 लाख 75 हजार रुपये हडपले. माहिती अधिकारात हे समोर आले आहे. त्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे आहेत. ज्या पाझर तलावातून गाळ उपसा केल्याचे दाखवले आहे, त्या तलावात काटेरी झुडपे वाढली…

Read More

खंडणी उकळल्याचेही उघड:नागपुरात वायुदल जवानाच्या पत्नीवर सामूहिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न, मध्य प्रदेशात नेऊन निकाह लावण्याचा प्रयत्न

हवाई दलातील जवानाच्या रिअल इस्टेट व्यावसायिक पत्नीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तिला तब्बल एक वर्ष ब्लॅकमेल करत तिच्याकडून ३ लाख ९ हजार खंडणी उकळली. तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणून मध्य प्रदेशात नेऊन निकाह लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली….

Read More

धक्कादायक:घरगुती वाद-कलहातून दीड वर्षाच्या मुलाला फाशी देऊन आईने केली आत्महत्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोळेवाडी येथील मन सुन्न करणारी घटना

तालुक्यातील कोळेवाडी येथे एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाला फाशी देऊन स्वतःही गळफास घेत जीवन संपवल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आशा सूर्यभान आंबेकर ( ३१) आणि त्यांचा दीड वर्षाचा मुलगा शिवांश अशी मृत . घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव…

Read More

शेतकऱ्याच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार घटनास्थळी:खोपडा येथील पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा, रामटेके यांचे आंदोलन स्थगित

मोर्शी तालुक्यातील खोपडा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार सागर ढवळे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीनंतर पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याने रामटेके यांनी आपले उपोषण तूर्त मागे घेतले आहे. रामटेके यांनी १६ जूनपासून उपोषणाचा इशारा दिला…

Read More

बिगबास्केटचे CEO हरी मेनन यांनी राजीनामा दिला:ॲमेझॉनचे अमित नंदा त्यांची जागा घेतील, टाटा ग्रुपच्या कंपनीत मोठा फेरबदल

टाटाच्या मालकीच्या ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म बिगबास्केटचे सह-संस्थापक हरी मेनन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने 16 जून रोजी याची अधिकृत घोषणा केली. ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉनमध्ये 11 वर्षांहून अधिक काळ काम केलेले अमित नंदा आता बिगबास्केटचे नवीन CEO म्हणून जबाबदारी सांभाळतील. सह-संस्थापक हरी मेनन बोर्डात कायम राहतील बिगबास्केटमध्ये झालेल्या या…

Read More