दीपक परतेती यांची पीएसआयपदी निवड:आदिवासी समाजातील पहिले युवक, जामगाव महेंद्री गावात जंगी स्वागत
वरुड तालुक्यातील जामगाव महेंद्री येथील आदिवासी समाजातील तरुण दीपक विश्वेश्वर परतेती यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली आहे. आदिवासी समाजातून या पदावर पोहोचणारे ते पहिलेच युवक ठरले आहेत, ज्यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. दीपक परतेती यांच्या यशाबद्दल महेंद्री ऍग्रो टुरिझमचे संचालक विजय श्रीराव आणि पहाट पक्षी मित्र मंडळातर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते….