Headlines

नागपुरात विवाहितेवर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव!:गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील व्हिडीओ, दोन आरोपींना अटक

नागपूरमध्ये एका विवाहित महिलेवर बलात्कार, ब्लॅकमेल करणे आणि धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याचे एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एका मौलवीचा शोध सुरू आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे या वादाला आणखीच हवा मिळाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख कळमेश्वरचे रहिवासी अय्याज…

Read More

अरबाज खानच्या गाडीत बळजबरीने घुसला व्यक्ती:सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ओढून बाहेर काढले आणि मारहाण केली; अभिनेता अस्वस्थ दिसला

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ आणि चित्रपट निर्माता अरबाज खान याच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोलकातामध्ये एका कार्यक्रमादरम्यान एक व्यक्ती जबरदस्तीने अरबाज खानच्या उभ्या असलेल्या गाडीत घुसून बसला. यानंतर, तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत त्या व्यक्तीला गाडीतून ओढून बाहेर काढले. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये बरीच धक्काबुक्की झाली आणि सुरक्षा…

Read More

बिल्डरकडून 80 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल:गुंतवणूक दुप्पट करण्याचे आमिष दाखवून केबल व्यावसायिकाला गंडा

पुण्यात एका केबल व्यावसायिकाची ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर योगेश अंबादास देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणुकीची रक्कम तीन वर्षांत दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. चतुःश्रृंगी पोलिसांनी देशपांडे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी धायरी येथील रहिवासी विशाल अरुण होनराव (वय ४५) यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी…

Read More

85% इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर ₹7.24 लाखांना मिळेल:पेट्रोल मॉडेलपेक्षा ₹86,000 महाग; ही देशातील पहिली फ्लेक्स-फ्यूएल कार

मारुति सुझुकीने सोमवारी भारतात पहिली फ्लेक्स-फ्यूएल कार वॅगन-आर बायोफ्लेक्स लॉन्च केली आहे. नवीन वॅगन-आर पूर्णपणे E85 इंधनावर (85% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) चालेल. वॅगन-आर बायोफ्लेक्स दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. याची सुरुवातीची किंमत 7.24 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या ही कार टॅक्सी आणि फ्लीटसारख्या व्यावसायिक क्षेत्रातील लोक खरेदी करू शकतील. याच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल…

Read More

सातारकरांचा नादखुळा!:चिमुकल्यांची बैलगाडीतून शाळेत एंट्री; सारथी झाले मंत्री शंभूराज देसाई, स्वागतासाठी अवघे गाव आणि वाजंत्री

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मरळी येथील वत्सलादेवी देसाई जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे अनोख्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या पुढाकारातून शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या आगळ्यावेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा…

Read More

रोशन आनंद यांचा दावा- खान सरांनी भावाला मारले:खान सर म्हणाले- नेपाळमध्ये आजाराने मृत्यू झाला; आज अंत्यसंस्कार

पाटणा येथील ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांनी फैजल खान उर्फ खान सर यांच्यावर भावाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. रोशन आनंद यांनी सोमवारी सांगितले की, खान सर आणि किसान कोल्ड स्टोअरचे मालक आर.एस. प्रसाद यांनी मिळून माझा भाऊ प्रिन्स याची हत्या केली आहे. रोशन आनंद यांना खान सर यांच्या कोचिंगवर झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणात…

Read More

शिवसेना ठाकरे गटात फुटीची चर्चा:आदित्य ठाकरे म्हणाले- अफवांवर विश्वास ठेऊ नका, आमचे खासदार आमच्या सोबतच

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली. बैठकीनंतर सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. मात्र, काही खासदार नव्या गटाच्या स्थापनेच्या तयारीत असल्याची…

Read More

MIFF 2026 Opens with Sara Dossas Time and Water; Honors Sir David Attenboroughs Centenary

जगभरातील प्रेक्षकांपर्यंत प्रभावी आणि विचारप्रवर्तक कथा पोहोचवण्याची परंपरा कायम ठेवत, नॅशनल जिओग्राफिक मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (MIFF) 2026 मध्ये दोन महत्त्वपूर्ण विशेष स्क्रीनिंग सादर करणार आहे. या दोन्ही प्रस्तुती डॉक्युमेंटरी कथाकथनाच्या . या विशेष सादरीकरणाचे नेतृत्व अकादमी पुरस्कार नामांकित चित्रपट निर्माती सारा डोसा यांच्या नवीन डॉक्युमेंटरी Time and Water कडे असेल. MIFF 2026 च्या उद्घाटन…

Read More

बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक:कोळसा येथील इंग्रजी शाळेकडून 5.08 कोटींच्या वसुलीचे आदेश

सेनगाव तालु्क्यातील कोळसा येथे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ‘कै. लखन सर्जेराव नाईक इंग्लिश स्कूल’ची ‘राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण’ योजनेअंतर्गत झालेली निवड रद्द करण्याचा निर्णय शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने घेतला आहे. या शाळेने बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने हि कारवाई करण्यात…

Read More

IAS तुकाराम मुंढेंचा धसका!:'साहेब येणार'च्या नुसत्या अफवेनेच राज्यातील बाजारपेठांना कुलूप, गुटखा माफियांचे धाबे दणाणले

राज्यातील कडक शिस्तीचे आणि धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या कठोर कार्यपद्धतीचा राज्यभर एवढा धसका घेण्यात आला आहे की, केवळ ते तपासणीसाठी येणार असल्याच्या अफवेनेच मोठ्या बाजारपेठा काही मिनिटांत कुलूपबंद होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे….

Read More