Headlines

ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही:RTO अधिकाऱ्यांमध्ये फोनवरुन खडाजंगी, ऑडिओ क्लिप व्हायरल

छत्रपती संभाजीनगर आरटीओ विभागातील दोन अधिकाऱ्यांमधील फोनवरील वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. वैजापूर परिसरात वाहन तपासणी आणि दंडात्मक कारवाई करण्याच्या अधिकारावरून आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये फोनवर तीव्र वाद झाल्याचे या कथित ऑडिओत ऐकायला मिळत आहे. हद्दीच्या नावाखाली सुरू असलेल्या कारवायांवर प्रश्न उपस्थित करत एका अधिकाऱ्याने, “ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही,” असे…

Read More

राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सविस्तर चर्चा…

Read More

NDA Nears Rajya Sabha Two-Thirds Majority Amidst TMC Split

नवी दिल्ली/कोलकाता8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तृणमूल काँग्रेस (TMC) मधील फुटीमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये NDA ला फायदा होऊ शकतो. TMC च्या बंडखोर खासदारांमुळे आणि राज्यसभा निवडणुकीमुळे NDA राज्यसभेत दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळ पोहोचू शकते. मात्र, लोकसभेत बंडखोर खासदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतरही युती या आकड्यापासून खूप दूर राहील. सध्या युती राज्यसभेत दोन-तृतीयांश बहुमतापासून 16 जागा दूर आहे. तर, लोकसभेत…

Read More

छावा फेम अभिनेत्री संचिता उगलेचे निधन:गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; आत्महत्या केल्याचा दावा, निधनाच्या काही तासांपूर्वी रील पोस्ट केली

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता उगले (वय ३० वर्षे) हिचे आज सकाळी निधन झाले आहे. प्राथमिक तपासानुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे मानले जात आहे. ‘दैनिक भास्कर’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व येथील अचोले पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) पाठवला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांनुसार, संचिता ही मुंबईजवळील नालासोपारा येथे आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत…

Read More

संजय राऊतांना ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन गिधाडच शोभते!:भाजपचा जोरदार पलटवार, म्हटले- संकटांवर राजकारण करण्याची त्यांची सवय!

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि महायुतीवर केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “ऑपरेशन टायगर, ऑपरेशन वुल्फची भाषा करणाऱ्या संजय राऊतांना प्रत्यक्षात ऑपरेशन गिधाडच शोभते,” अशा शब्दांत बन यांनी हल्लाबोल करत राऊतांवर वैयक्तिक आणि राजकीय दोन्ही स्तरांवर निशाणा साधला. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना…

Read More

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज ₹2,369 ने महाग होऊन ₹1.50 लाख/10gm झाले

सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी त्याची किंमत 2.43 लाख रुपये प्रति किलो होती. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 2,369 रुपयांनी वाढून 1.50 लाख रुपयांवर पोहोचले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा…

Read More

एआयसाठी नियामक पद्धत निर्माण करा – विवेक सावंत:मानवजातीची सेवा करावी, तिची जागा घेऊ नये अशी मागणी

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मेंटॉर विवेक सावंत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय) नियामक पद्धत निर्माण करण्याची गरज व्यक्त केली आहे. पुणे येथे आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील सत्यशोधन’ या संवाद सत्रात ते बोलत होते. एआयने मानवजातीची सेवा करावी, तिची जागा घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. अमेरिकेसह जगभरात एआय आणि डेटा सेंटरला विरोध होत असून, भारतातही नागरी समाजाने…

Read More

विधान परिषदेवरून महायुतीत धुसफूस वाढली:शंभूराज देसाईंचा थेट इशारा- "आता आलेल्या परिस्थितीला भाजपलाच सामोरे जावे लागेल"

सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतरही शिवसेनेचा पाठिंबा अद्याप स्पष्ट झालेला नसताना राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. “नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवेळी आम्ही समन्वयाचा प्रयत्न केला, पण भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला भाजपलाच…

Read More

गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने साडेआठ लाखांची सायबर फसवणूक:महिलेसह दोघांना गंडा, मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

पुणे शहरात गॅस देयक अद्ययावत (अपडेट) करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका महिलेसह दोघांची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी अलंकार आणि मुंढवा पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एरंडवणे येथील हिमाली सोसायटीत राहणाऱ्या एका ४९ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी लक्ष्य केले. गॅस पुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीच्या नावाने त्यांना एक संदेश पाठवण्यात…

Read More

संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको:खासदार कल्याण काळे पोलिसांच्या ताब्यात, ‘पुन्हा आंदोलन करू’चा इशारा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी संभाजीनगर-जालना महामार्गावरील केंब्रिज चौकात जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. काँग्रेसच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून तब्बल ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलक खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक…

Read More