श्रींच्या तीर्थक्षेत्रीय सप्ताहाकरिता पैठणला भाविकांची मांदियाळी:श्री ज्ञानेश्वरी व भावार्थ रामायणाचे ज्ञान सप्ताहाचा श्रीगणेशा
तीर्थ यात्रे सुखे जाऊ । वाचे विठ्ठलनाम घेऊ । संता संगे सेऊ । वासुदेव धणीवरी ॥ या अभंगोक्तिनुसार प्रतिवर्षी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्रीक्षेत्र श्रद्धासागर, अकोटद्वारे एका तीर्थक्षेत्रावर जाऊन श्रींच्या तीर्थक्षेत्रिय ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी श्रीक्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात सप्ताहाचा श्रीगणेशा झाला. पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी…