भिवंडी पालिकेत ACB चा 'सर्जिकल स्ट्राईक':सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना लाच घेताना अटक; अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्याची धमकी, अडीच लाखांच्या रकमेसह सापडले जाळ्यात
अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्याची धमकी देऊन खिसे गरम करणाऱ्या एका बड्या अधिकाऱ्याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी संध्याकाळी रंगेहात बेड्या ठोकल्या. भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ३ (पद्मानगर) चे सहाय्यक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) सुरेंद्र भास्कर भोईर असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. एका खाजगी गाडीत लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना ‘एसीबी’ने हा सापळा यशस्वी केला. नेमकं…