कांदा दर:कांदा दर घसरणीवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून 5 तज्ज्ञांची उपसमिती स्थापन, 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
गेल्या काही काळापासून कांद्याच्या बाजारभावात होणारी घसरण आणि त्यामुळे शेतकरी वर्गात निर्माण झालेली चिंतेची परिस्थिती पाहता राज्य शासनाने अखेर एक मोठा निर्णय घेतला आहे. कांदा दरातील घसरणीवर तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ५ तज्ज्ञ सदस्यांची एक विशेष उपसमिती नियुक्त केली आहे. या समितीला अवघ्या १५ दिवसांत आपला सविस्तर अहवाल शिफारशींसह…