स्वच्छतेची जबाबदारी केवळ मनपाची नसून प्रत्येक नगरकरांचीही- महापौर:शाहू महाराज जयंतीनिमित्त अभियान; सक्कर चौक परिसराची केली साफसफाई
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरभर विशेष स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. “स्वच्छतेमुळे शहराचे सौंदर्य वाढतेच, शिवाय नागरिकांचे आरोग्यही सुदृढ राहते. ही जबाबदारी केवळ महापालिकेची नसून प्रत्येक नगरकरांची आहे, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. यापुढे प्रत्येक दहा दिवसांनी शहरातील विविध भागांमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे….