Headlines

लोककलावंतांच्या मानधनात वाढ करा- दशरथ धुमाळ:अधिवेशनात मागण्या मांडण्याची आ. जगताप यांना विनंती‎

हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ धुमाळ यांनी लोककलावंतांच्या मागण्यांसंदर्भात नुकतीच आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मागणीचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील लोककलावंतांच्या मागण्या आमदारांनी मांडाव्यात, अशी विनंती धुमाळ यांनी यावेळी केली. पारंपरिक लोककलावंतांची निवड इष्टांक ५०० पाचशे करावा अशी मागणी या…

Read More

चंपत रायच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट हरिद्वार येथे तयार:RSS ने फटकारले, 25 जून रोजी रात्री सांगितले- पद सोडा

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी दबावाखाली आपल्या पदाचा राजीनामा दिला. याची पटकथा 8 दिवसांपूर्वी हरिद्वारमध्ये लिहिली गेली. विश्व हिंदू परिषदेची 18 आणि 19 जून रोजी हरिद्वारमध्ये बैठक होती. यात अयोध्येतून चंपत राय आणि गोपाल राव सहभागी झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय…

Read More

शिंदे सेनेत जाऊनही भालकेंची राजकीय कोंडी कायम:सात नगरसेवकांनी सोडली साथ, भाजपकडून अडवणूक सुरूच, पंढरपुरात नाट्यमय घडामोडी‎

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत बुस्टर डोस मिळालेल्या भालके गटाच्या अडचणी कमी होताना दिसेनात. एका बाजूला नगरपालिकेच्या विकास कामांसाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेला असताना दुसऱ्या बाजूला सहकारी नगरसेवक फोडण्याचे काम पडद्याआडून भाजप करीत आहे. त्याचबरोबर . पंढरपूर तालुक्याच्या राजकीय पटलावर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पांडुरंग परिवार आणि दिवंगत आमदार भारत भालके यांचा भालके गट सर्वात प्रभावशाली…

Read More

पर्यटनाला बळ:मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन; भूसंपादनासाठी‎ अक्कलकोटमध्ये प्रशासकीय हालचाली‎

योगेश कबाडे | अक्कलकोट मुंबई–हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीसाठी प्रशासन स्तरावरुन गती घेतली जात आहे. अक्कलकोट तालुक्यातील तब्बल ९ गावांमधील शेती १६५ गट व ९८० शेतक-यांचे क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार सलगर, अक्कलकोट ग्रामीण, हासापूर आणि हत्तीकणबस या गावांचे अधिक क्षेत्र असू शकते. प्राथमिक भूसंपादन प्रस्तावात अनेक गटांचा समावेश केला आहे. अंतिम अधिसूचना,…

Read More

विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास साधावा- शिंदे:खडांबे येथील विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी‎

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. सर्व समाजघटकांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी त्यांनी अनेक लोकहितकारी निर्णय घेतले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा, असे आवाहन प्राचार्य अप्पासाहेब शिंदे यांनी केले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री शाहू विद्या मंदिर खडांबे येथे…

Read More

खरीपाच्या पेरण्यांना ब्रेक; 6.74 लाख हेक्टरपैकी फक्त 2.89% क्षेत्रावर पेरणी:11 वर्षांतील जूनमधील सर्वात कमी पावसाचा फटका‎

जिल्ह्यात मान्सून लांबल्याचा सर्वाधिक फटका यंदाच्या खरीप हंगामाला बसला आहे. जूनचे २६ दिवस उलटूनही जिल्ह्यात केवळ ४१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने खरीपाच्या पेरण्यांना अक्षरशः ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील ६ लाख ७४ हजार ४६१ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ १९ हजार ४६८.९२ हेक्टरवर म्हणजेच अवघ्या २.८९ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. गेल्या ११ वर्षांतील हा जूनच्या…

Read More

सत्कार झाला, पण चर्चा “त्यागा’च्या मिश्किल कोपरखळीची:4 आमदारांच्या सत्कार सोहळ्यात आ. कोल्हे म्हणाले, सुजयदादांच्या त्यागामुळे माझा नंबर लागला‎

. विधान परिषदेवर गेलेल्या जिल्ह्यातील ४ नवनिर्वाचित आमदारांचा शुक्रवारी झालेला सत्कार सोहळा चांगलाच रंगला. काहीसे शिस्त व गंभीर वाटणाऱ्या राजकीय मंचावर आमदार विवेक कोल्हे यांनी माजी खासदार सुजय विखे यांचे आभार मानले. पण ते मानताना त्यांनी “माजी खासदार सुजय विखे यांनी त्याग केला म्हणून आपला नंबर लागला’ हे वक्तव्य उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरले. दरम्यान, सुजय…

Read More

सलग तिसऱ्या वर्षी मोहरम मिरवणूक रेंगाळली:दोन्ही सवाऱ्या रात्री पावणेनऊ वाजता दिल्लीगेटमधून बाहेर,पावसाच्या हजेरीनंतर वाढला वेग‎

शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मोहरम मधील इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या सवारीची ‘कत्तलची रात्र’ व विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. मात्र, या दोन्ही मिरवणूका बराचवेळ रेंगाळल्या. कत्तलची रात्र मिरवणूक शनिवारी रात्री बारा वाजता सुरू झाली. . दोन्ही मिरवणुका पारंपारिक मार्गाने काढण्यात आल्या. त्यासाठी सुमारे एक हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी असा मोठा…

Read More

काश्मिरी तरुणीचे बॉयफ्रेंड सोडून पाक सैनिकाशी लग्न:वॉशरूममधून मेसेज पाठवून INS विक्रांतला बुडण्यापासून वाचवले; सहमत पार्ट-1

दैनिक दिव्य मराठीच्या नवीन ‘स्पाई फाइल्स’ मालिकेत आज एका अशा काश्मिरी मुलीची गोष्ट, जिने हेरगिरीसाठी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी लग्न केले आणि नंतर पतीची हत्या केली… नोव्हेंबर 1971, दुपारची वेळ. दिल्लीतील लोधी रोडवर भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच RAW चे कार्यालय. बाहेर हिवाळ्याचे कोवळे ऊन होते, पण आतले वातावरण एखाद्या धगधगत्या ज्वालामुखीसारखे होते….

Read More

पिंपळगाव बसवंतला जेईई-सीईटी परीक्षेतील गुणवंतांची मिरवणूक:कै. बी. पी. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शहरातून ‘यशोत्सव रॅली’‎

प्रवेश परीक्षा जेईई, सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कै. बी. पी. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला. शहरातून काढण्यात आलेल्या ‘यशोत्सव रॅली’ने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले. . महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर बनकर,…

Read More