Headlines

45 जार शुद्ध पाण्याने भागवली तहानलेल्या खैरेवाडीकरांची तहान:इगतपुरीतील सामाजिक कार्यकर्त्यांसह वन विभागाने राबविला समाजाेपयाेगी उपक्रम‎

तालुक्यातील अतिदुर्गम खैरेवाडी येथे तीव्र पाणीटंचाईमुळे आदिवासी बांधवांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून ४५ जार शुद्ध पिण्याचे पाणी गावात पोहोचविण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा . शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा पडत असल्याने नागरिकांसमोर स्वतः प्यायचे की जनावरांना पाजायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती…

Read More

तरुणीवर वळूच्या हल्ल्यानंतर मोकाट जनावरांविरोधात पालिकेचा दंडुका:मनमाडचे नगराध्यक्ष पाटील यांच्या सूचना; हलगर्जी केल्यास कारवाईचा इशारा‎

शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दत्त मंदिर रस्त्यावर भरदिवसा एका मोकाट वळूने दुचाकीस्वार तरुणीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरभर संतापाची लाट उसळली असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मोकाट जनावरे तातडीने पकडून कोंडवाड्यात पाठविण्याचे आदेश देण्यात…

Read More

शेळावेत सामाजिक सलोख्याचे दर्शन:मोहरमनिमित्त ग्रामस्थांकडून गावातील मुख्य चौकात सरबत वाटप‎

पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द गावात मोहरम निमित्त सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपत भव्य सरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, यातून गावातील धार्मिक एकोप्याचे दर्शन घडले.मोहरम या पवित्र महिन्याचे औचित्य साधून गावातील मुख्य चौकात सर्वधर्मीय बांधवांसाठी थंडगार सरबत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम…

Read More

आंतरराष्ट्रीय एकल दिन:सटाण्यात 100 एकल महिलांना शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन

प्रतिनिधी | नांदगाव येथील नगरपरिषदेने एकल महिलांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करत १८४ महिलांची नोंदणी केली तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समुपदेशन केंद्राची स्थापना केली. या उपक्रमाला ७५ हून अधिक एकल महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी नगरपरिषदेद्वारे नोंदणी मोहीम राबविण्यात आली. मेळाव्यात एकल महिलांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, सामाजिक सुरक्षा योजना, आर्थिक सहाय्य…

Read More

‘गोविंदा… गोविंदा…’च्या जयघोषात महाआरती‎:लासलगावला श्री बालाजींना आंब्याच्या रसाचा ज्येष्ठाभिषेक

लासलगाव येथील श्री बालाजी मंदिरात शुक्रवारी (दि. २६) पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठाभिषेक (आंबाभिषेक) सोहळा भक्तिभावात पार पडला. श्री बालाजी भगवानांना आंब्याच्या रसाने विशेष अभिषेक करण्यात आला. आकर्षक फुलांची सजावट, धार्मिक विधी आणि मंगलमय वातावरणामुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या अभिषेक सोहळ्यास लासलगाव व परिसरातील शेकडो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा…

Read More

MP – झारखंडमध्ये वादळ – विजांमुळे 16 जण ठार:उत्तराखंडमध्ये घर -शाळांत ढिगारा शिरला; UP, राजस्थान, हरियाणात तापमान 42°C+

देशातील 6 राज्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मात्र, सहा राज्यांमध्ये तीव्र उष्णताही जाणवत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणात पारा 42°C पेक्षा जास्त नोंदवला गेला. मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये शुक्रवारी वीज कोसळून 4 लोकांचा मृत्यू झाला, तर आठ जण भाजले. देवासमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे घराच्या…

Read More

पीएम स्वनिधी योजनेतून पथविक्रेत्यांना कर्जवाटप:सटाण्यात तीन टप्प्यांत 15, 25 व 50 हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण‎

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या सभागृहात लोककल्याण मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात पात्र पथविक्रेत्यांना १५ हजार, २५ हजार आणि ५० हजार रुपयांचे कर्ज तीन टप्प्यांत उपलब्ध करून देण्यात आले. नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी…

Read More

वेरूळ घाटात बिबट्याचे दर्शन; प्रवाशांमध्ये भीती:नागरिकांना वन विभागातर्फे खबरदारीचा इशारा‎

खुलताबाद-वेरूळ परिसरात सध्या बिबट्याच्या वावरामुळे नागरिक, भाविक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी रात्री शहरालगतच्या शंजरी हॉटेलजवळ म्हणजेच वेरूळ घाटाच्या सुरुवातीलाच एका बिबट्याचे दर्शन झाले. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर, सुलिभंजनचा दत्त डोंगर आणि थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ येथे दररोज हजारो पर्यटक आणि भाविक येत…

Read More

पैठण एमआयडीसीत 5 उद्योग येणार; 1 हजार रोजगाराची संधी‎:इनकोर हेल्थकेअरसह प्रमुख उद्योगांकडून प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला मिळतेय मोठी गती

पैठण एमआयडीसीमध्ये उद्योगविस्ताराला नव्याने गती मिळाली असून येथील नामांकित कंपन्या आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व विस्तार करत आहेत. याच धर्तीवर आणखी पाच नवीन मोठे उद्योगही एमआयडीसीमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. या पा . सध्या पैठण औद्योगिक वसाहतीमध्ये इनकोर हेल्थकेअर, लेझर इंडिया, हिंदुस्तान कंपोझिट, मीनाक्षी अ‍ॅग्रो आणि मॅट्रिक्स लाइफ यांसारख्या प्रमुख कंपन्यांकडून उत्पादन…

Read More

CM शुभेंदु अधिकारी म्हणाले- बंगालमध्ये UCC लागू होणार:लँड जिहाद, लव्ह जिहाद, सक्तीच्या धर्मांतरावर कायदा आणणार; घुसखोरांना परत पाठवणार

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी सांगितले की, त्यांचे सरकार राज्यात समान नागरी संहिता (UCC) लागू करेल. लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतराविरोधात कठोर कायदाही आणला जाईल. ते म्हणाले की, जे लोक बेकायदेशीरपणे भारतात आले आहेत. देशाच्या संस्कृती किंवा राष्ट्रीय सुरक्षेविरुद्धच्या कारवायांमध्ये सामील आहेत, त्यांना राज्यात राहू दिले जाणार नाही. बेकायदेशीर घुसखोरांची ओळख पटवून…

Read More