Headlines

व्यावसायिक LPG वरील मर्यादा हटवली, आता 100% पुरवठा होईल:केंद्र सरकारचा निर्णय, उद्योगधंद्यांसाठी मोठ्या प्रमाणात पुरवठ्यावरची बंदीही हटवली

केंद्र सरकारने राज्यांना पुन्हा एकदा एलपीजी पुरवठा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने आज, म्हणजेच 25 जून रोजी, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील सर्व क्षेत्रनिहाय निर्बंध हटवले आहेत. गॅस संकटामुळे सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यात कपात केली होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले की, याव्यतिरिक्त, गॅस संकटाच्या सुरुवातीला उद्योगांना थांबवण्यात आलेल्या बल्क एलपीजीच्या पुरवठ्यातही शिथिलता आणली…

Read More

वसमतमध्ये बोगस 'गावठाण' प्रमाणपत्राद्वारे भूखंडाची विक्री:दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

वसमत शहरातील सर्वेनंबर १८० मध्ये गावठाणचे बनावट प्रमाणपत्र जोडून भुखंडाची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. २५ फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या भागातील खरेदी विक्रीत मोठा गोंधळ उघडकीस येणार असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील सर्वेनंबर १८० मध्ये पालिकेच्या मालकिची जागा आहे. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून…

Read More

Pune Ketan Aggarwal Murder: Sia Goyals Parents Statement

पुण्यात केतन अग्रवालच्या हत्येची आरोपी सिया गोयलच्या पालकांनी गुरुवारी पहिल्यांदाच आपली बाजू मांडली. सियाची आई पूजा गोयल म्हणाल्या की, जर सिया दोषी असेल तर तिला फाशी द्यावी. सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी दावा केला की, सियाने कधीही लग्नाबद्दल आक्षेप घ . सियाचे वडील २३ जून रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल आहेत. त्यांनी रुग्णालयात माध्यमांशी…

Read More

अमरावतीत शासकीय इमारत असतानाही आदिवासी अभ्यासिकेसाठी भाड्याने जागा:आमदार खोडके यांच्या लक्षवेधीनंतर गृहपाल निलंबित, भाडे वसुलीचे आदेश

अमरावती येथे आदिवासी विकास विभागाच्या अभ्यासिकेसाठी सुसज्ज शासकीय इमारत उपलब्ध असतानाही, राजकमल चौकातील एका खाजगी मॉलमध्ये दरमहा ८ लाख ६८३ रुपये भाड्याने जागा घेण्यात आली. २०२८ पर्यंतच्या या भाडेकरारामुळे गेल्या १४ महिन्यांत शासनाच्या तिजोरीतून १ कोटी १२ लाख रुपये भाड्यापोटी अदा करण्यात आले आहेत. आमदार सुलभाताई खोडके यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रकार उघड…

Read More

शिक्षकांना द्यावी लागणार टीईटी परीक्षा:नोकरी टिकवण्यासाठी 18 हजार शिक्षक 38 केंद्रांवर चाचणी देणार

एरवी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना आता स्वतःचीच परीक्षा द्यावी लागणार आहे. शासनाने सप्टेंबर २०२८ पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे अनिवार्य केले असल्याने, नोकरी वाचवण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू झाली आहे. आगामी रविवार, २८ जून रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अमरावती तालुक्यात ३८ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १८ हजार ११९ शिक्षकांनी…

Read More

टाकरखेड्यात वाकलेला वीज खांब:वारंवार अपघात, नागरिकांच्या जीविताला धोका

टाकरखेडा संभू परिसरातील मुख्य मार्गावर एक वीज खांब धोकादायकरीत्या वाकलेला आहे. यामुळे वारंवार अपघात घडत असून, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तो धडकत असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या स्थितीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या खांबावर सुमारे १५० घरगुती वीज जोडण्या आहेत. वाहनांच्या धडकेमुळे अनेकदा या जोडण्यांच्या वीज तारा तुटतात. परिणामी, एक ते दोन…

Read More

अनुकंपा नियुक्तांना जुनी पेन्शन लागू करा:जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेची ग्रामविकास विभागाकडे मागणी

केंद्र शासनाने अनुकंपा नियुक्तीच्या प्रकरणांमध्ये अर्ज सादर केल्याची तारीख निर्णायक मानून जुन्या पेन्शन योजनेचा (ओपीएस) लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील अनुकंपाधारकांनाही न्याय मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेने राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन सादर केले आहे. भारत सरकारच्या निवृत्ती वेतन व…

Read More

केंद्राच्या जागांवरील भाडेकरूंचा सर्वोच्च न्यायालयात लढा:'एनटीसी'च्या कारवाईला उच्च न्यायालयाचा ब्रेक, वाचा सविस्तर

मुंबईसह देशभरातील केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांच्या (PSUs) आणि कंपन्यांच्या जमिनींवर अनेक दशकांपासून वास्तव्य करणाऱ्या लाखो भाडेकरू आणि चाळकरी नागरिकांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध जॅम मिलमधील 13 रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी ‘नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन’ने (NTC) सक्तीच्या निष्कासनाची कारवाई सुरू केली होती. मात्र, या प्रक्रियेला आता मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण…

Read More

संजय दिना पाटलांचा अखेर माफीनामा:आधी पत्रकारांना शिवीगाळ, टीकेची झोड उठताच दिलगिरी व्यक्त; काय म्हणाले पाटील?

शिवसेना शिंदे गटात गेलेले ठाकरे गटातील फुटीर नेते संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना असभ्य भाषेचा वापर केला होता. यावरून चांगलेच राजकारण पेटले होते. मुंबई पत्रकार संघाने या विरोधात निदर्शने देखील केली. अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमध्ये असले प्रकार चालणार नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांना सुनावले…

Read More

पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 20 जुलैपासून नि:शुल्क स्पर्धा परीक्षा वर्ग:प्रवेशासाठी 12 जुलैला विद्यापीठात निवड चाचणी

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी २० जुलैपासून नि:शुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ग सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होतील. या मार्गदर्शन वर्गात विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी, बँक आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी अनुभवी मार्गदर्शकांकडून आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळेल. हा वर्ग…

Read More