Headlines

देवस्थान इनाम समितीवर अमरावतीचे अनुप जयस्वाल यांची निवड:राज्यातील जमिनींबाबत अधिनियम तयार करण्यासाठी 13 सदस्यीय समिती स्थापन

राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत अधिनियम तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या १३ सदस्यीय समितीवर अमरावतीचे अनुप जयस्वाल यांची निवड झाली आहे. महसूल खात्याने ही घोषणा केली. या समितीत विदर्भातून नागपूरचे अनिल सांबरे यांचाही समावेश आहे. अनुप जयस्वाल हे मूळचे रिद्धपूर (ता. मोर्शी) येथील रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते देवस्थानच्या बळकावलेल्या जमिनी मुक्त करून त्या संबंधित…

Read More

अमरावती जिल्ह्यात 6 मंडळांत अतिवृष्टी:अमरावती, दर्यापूर, अंजनगाव सुर्जीमध्ये जोरदार पाऊस, 4 घरांची अंशतः पडझड

अमरावती जिल्ह्यात बुधवारी मान्सूनने दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतील सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे चार घरांची अंशतः पडझड झाली, तर मोर्शी तालुक्यात वीज पडून तीन बकऱ्या दगावल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती निवारण विभागाने गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, अमरावती तालुक्यातील अमरावती महसूल मंडळात ९१.५ मिमी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा महसूल मंडळात…

Read More

इर्विन रुग्णालयात पाणी शिरले, रेडिओलॉजी विभाग बंद:डफरीन, सुपरची मदत; सेवा शुक्रवारपासून पूर्ववत

अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (इर्विन) अपघात कक्षात बुधवारी सायंकाळी पाणी शिरले. यामुळे गुरुवारी दिवसभर येथील रेडिओलॉजी विभाग बंद ठेवण्यात आला. पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) आणि संदर्भ सेवा रुग्णालयातील (सुपर स्पेशालिटी) संबंधित विभागांची मदत घेण्यात आली. इर्विनचा रेडिओलॉजी विभाग स्वच्छ करण्यात आल्याने शुक्रवारपासून सर्व सेवा पूर्ववत सुरू होतील, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले….

Read More

अभिनेत्री कृषी थापांडाच्या फ्लॅटमधून मित्राचा मृतदेह सापडला:पोलिसांना आत्महत्येचा संशय; घटनेपूर्वी अभिनेत्रीला केला होता फोन

बंगळुरूमध्ये कन्नड अभिनेत्री कृषी थापांडाच्या फ्लॅटमध्ये त्यांच्या ४५ वर्षीय मित्राचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, मृताची ओळख व्यावसायिक वैशाख अशी झाली आहे आणि प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली, जेव्हा वैशाखचा मृतदेह राजराजेश्वरनगर येथील अभिनेत्रीच्या फ्लॅटमध्ये छताच्या पंख्याला…

Read More

गे डेटिंग ॲपवरून तरुणाला बोलावले, नागपुरात लुटले:रात्रभर फिरवून लुटणाऱ्या 5 दरोडेखोरांना अटक

नागपूरच्या मानकापूर परिसरात ‘गे डेटिंग’ ॲपच्या माध्यमातून एका १८ वर्षीय तरुणाला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाला रात्रभर नागपुरात फिरवून मारहाण केली, धमकावले आणि त्याच्याकडून १०,००० रुपये उकळले. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘पोलो’ नावाच्या गे डेटिंग ॲपचा वापर करून पीडित तरुणाशी संपर्क साधला. ॲपवर…

Read More

महाराष्ट्राच्या राज्यप्राणी शेकरूसह दुर्मीळ वन्यजीव तस्करांच्या तावडीतून सुटले:नागपूर डीआरआयने आंध्र प्रदेशात मोहीम राबवून एकाला अटक केली

महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या (DRI) नागपूर युनिटने आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या दोन दिवसीय मोहिमेत वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणारी टोळी उद्ध्वस्त करण्यात आली. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या चार ‘शेकरू’सह अनेक दुर्मीळ प्राण्यांची तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात आली असून, एका मुख्य तस्कराला अटक करण्यात आली आहे. डीआरआयच्या नागपूर पथकाला आंध्र प्रदेशातील जंगलातून वन्यजीवांची मोठी…

Read More

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टने FIR दाखल केली:यात टिन्नू यादवसह 8 जणांची नावे; SIT ने 17 जणांना आरोपी मानले होते

राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने गुरुवारी एफआयआर (FIR) दाखल केली आहे. यात 8 आरोपी बनवण्यात आले आहेत. ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनी एसआयटीच्या (SIT) प्राथमिक अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल केला. एसआयटी (SIT) तपासणीसाठी 13 जून रोजी स्थापन करण्यात आली होती. 23 जून रोजी तिने आपला अहवाल सरकारला सादर केला. एफआयआरमध्ये…

Read More

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा:जमिनीवरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

राज्यातील वीर जवान आणि अधिकारी शहीद झाल्यानंतर त्यांच्या वीर माता, वीर पत्नी किंवा अधिकृत वारसांना उदरनिर्वाहासाठी शासनाकडून शेतीसाठी जमीन दिली जाते. मात्र, ही जमीन त्यांच्या नावावर करताना मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, अशी…

Read More

महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही, मी पत्रकारांसोबत:संजय दिना पाटलांचा बोंब मारत निषेध करतो- गुणरत्न सदावर्ते

शिवसेना ठाकरे गटातील फुटीर खासदार आणि सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना अर्वाच्य भाषेचा वापर केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे पडसाद अधिवेशनातही उमटलेले दिसले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली…

Read More

'खासदार झाले, आता पुढचा नंबर आमदारांचा':भाजप नेते नारायण राणेंचे मोठे विधान; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत काय म्हणाले राणे?

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ठाकरे गटाला पुन्हा एकदा बंडखोरीला सामोरे जावे लागले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेत आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील काही आमदारांची अनुपस्थिती होती. यावरून पुन्हा उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या असून आता यात भाजप नेते नारायण राणे यांनी मोठे विधान करत…

Read More