Headlines

यंदा एमबीबीएसचे 100 प्रवेश अधांतरी:राज्य सरकारला केंद्राला द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र, यावर्षी प्रवेशाची शक्यता धुसर‎

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे ६ मे २०२५ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाली. या निर्णयानंतर यंदाच १०० एमबीबीएस प्रवेश सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, आवश्यक प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष भरती न झाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) मनुष्यबळ अपुरे असल्याचे नमूद करत सलग दुसऱ्यांदा…

Read More

घाटघरमध्ये 185 मिमी पावसाची नोंद:भंडारदरा परिसरात घरांची पडझड, पत्रे उडाले; झाडे पडल्याने वाहतूक ठप्प

तालुक्यातील भंडारदरा आणि परिसरात बुधवारी (२२ जुलै) सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर काहींची घरे उद्ध्वस्त झाली. रस्त्यांवर ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने या भागातील दैनंदिन वाहतूक ठप्प झाली होती. अचानक आलेल्या या आपत्तीमुळे आदिवासी भागातील नागरिकांचे मोठे आर्थिक व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान…

Read More

वीजप्रश्नावरून उद्रेक, कामते शिंगवे ग्रामस्थांचे तहसीलसमोर उपोषण:स्वतंत्र गावठाण फिडर‎ आणि 4 नवीन‎डीपींसाठी रणकंद‎

तालुक्यातील कामते शिंगवे येथील प्रलंबित वीजप्रश्नांवर महावितरणकडून सतत होणाऱ्या टाळाटाळीला कंटाळून अखेर ग्रामस्थांचा उद्रेक झाला. स्वतंत्र गावठाण फिडर, नवीन रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) आणि अखंडित वीजपुरवठ्याच्या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी (२३ जुलै) सरपंच गौतम कराळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पाथर्डी तहसीलसमोर उपोषण सुरू केले. आंदोलकांनी महावितरण प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध करत तहसील परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला. यापूर्वी प्रशासनाला लेखी…

Read More

करीना म्हणाली- विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकणे उपकार नाही, तर कर्तव्य:कमल हासन म्हणाले- व्यवस्था सडली; इमरान, वरुणसह अनेक अभिनेते समर्थनार्थ पुढे

दिल्लीत कॉकरोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आणि शिक्षण सुधार आंदोलनाला आता बॉलिवूड सेलिब्रिटींचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सलमान खान, आलिया भट्ट आणि अनन्या पांडे यांच्यानंतर आता करीना कपूर खान, कमल हासन, वरुण धवन, इमरान खान आणि पीयूष मिश्रा हे देखील विद्यार्थ्यांच्या बाजूने आले आहेत. करीना कपूर म्हणाली की, देशातील तरुणांची मागणी ऐकणे…

Read More

नवपिढीने गुरु-शिष्यांच्या कार्याचा आदर्श घेणे गरजेचे:चांदोरी येथे प्राचार्य डॉ. माधव देवरे यांचे प्रतिपादन‎

चांदोरी येथील के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ, सहकार महर्षी माधवराव (तात्यासाहेब) बोरस्ते आणि दानशूर काकुशेठ उदेशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. माधव देवरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुरेश भोज प्रमुख अतिथी…

Read More

चांदवडमध्ये भरपावसात आंदोलन:घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी‎

नीट पेपरफुटीप्रकरणी नवी दिल्ली येथील जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि. २३) चांदवड येथे प्रमुख विरोधी समविचारी पक्ष, संघटना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन दिले. यावेळी घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या…

Read More

दिल्ली घटनेचा सोयगाव येथे कडकडीत बंद पाळून निषेध:विद्यार्थी आंदोलनातील अमानुष मारहाणीच्या निषेध‎

दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर लोकशाही व शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या विद्यार्थी रॅलीवर भाजप सरकारने पोलिस व गुंडांकडून अमानुष मारहाण केली. यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी (दि.२३) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. सोयगाव येथे त्या…

Read More

कन्नड शहरात पहाटे तीन‎तास मुसळधार पाऊस‎:रस्त्यावर पाणी, पालिकेने रस्ता केला मोकळा

कन्नड शहरात बुधवारी (दि.२२) पहाटे तीन ते सहा वाजेरदरम्यान मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शहरातील जवाहर कॉलनी, मोमीनपुरा, म्हाडा कॉलनी, त्रिशरण बुद्धविहार, सुंदर कॉलनी या वसाहतीकडे जाणारा रस्ता जलमय होऊन नागरिकांचे दळणवळण ठप्प झाले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, नगराध्यक्ष फरीन बेगम, नगरसेवक अब्दुल जावेद, बंटी सुरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन युद्धपातळीवर रस्ता मोकळा…

Read More

खंडाळा शाळेतील वर्गखोल्या, संगणक कक्ष:स्वच्छतागृह व पटांगणाची पाहणी, खंडाळा शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणार- जि. प. सदस्य संजय निकम‎

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावर अधिक भर द्यावा. तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी केले. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद प्रशालेस भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भेटीदरम्यान निकम…

Read More

गोदावरी काठावरील गावांची वाढली धाकधूक:55 हजार क्युसेकने विसर्ग, प्रशासन अलर्ट मोडवर; नदी परिसरात रात्रीतून पूरस्थिती वाढण्याची शक्यता‎

नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परिणामी गंगापूर, दारणा, पालखेडसह विविध धरणांमधील विसर्गात वाढ करण्यात आली आहे. नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोद . रात्रीतून पाण्याची पातळी अचानक वाढू शकते ^सध्या गोदावरी नदीपात्रात ५५ हजार ७७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रात्रीतून पाण्याची पातळी अचानक वाढू…

Read More