Headlines

बंदला अकोट शहरात संमिश्र प्रतिसाद:देवरी फाट्यावर रस्तारोको; वाहतूक ठप्प, पोलिसांच्या मध्यस्तीने मार्ग मोकळा‎

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अकोट शहर व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात आंदोलक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. त्यांनी बंदचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी शहरातील मुख्य मार्गांवरून फिरत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी सुरुवातीला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. मात्र आंदोलक पुढे गेल्यानंतर दुपारपर्यंत बहुतांश बाजारपेठा पुन्हा…

Read More

The young generation should strive for knowledge, culture, and social service

Marathi News Local Maharashtra Aurangabad The Young Generation Should Strive For Knowledge, Culture, And Social Service Nivruti Maharaj Indurikar, Gave A Message Of Social Enlightenment To Devotees Through Kirtan In Khamgaon खामगाव4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक खामगाव मान्यता क्षणीक असते,ती कायम स्वरुपी नसते,धन्यता चंद्र-सुर्य असे पर्यंत टिकते,पण विद्वत्ता ही माणसाच्या मृत्यूनंतरही त्याच्या सोबत अमर राहते.या तिनही…

Read More

तिवस्यात बाजारपेठ दिवसभर बंद:केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

देशभरातील कथित पेपरफुटीच्या घटनांविरोधात वाढत असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी येथे सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्यावतीने ऐतिहासिक एकदिवसीय बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शेतकरी, युवक, विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले, किरकोळ दुकाने तसेच…

Read More

शहरात आजपासून हेल्मेटची सक्ती कडक:दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही आता अनिवार्य : खरेदीसाठी वाहनधारकांची लगबग‎

रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यामध्ये जाणाऱ्या निरपराध नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. शुक्रवारपासून (दि. २४) शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी चालक आणि त्यांच्या मागे बसणाऱ्या (पिलियन रायडर) हेल्मेटचा वापर करणे कायदेशीररित्या अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या चालकांचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो,…

Read More

लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याची जनजागृती केली- रघुनाथ वाडेकर

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तत्कालिन कठिण परिस्थितीत केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यासाठी जनजागृती घडवून आणली. पत्रकारिता हे राष्ट्रजागृतीचे प्रभावी माध्यम बनवत त्यांनी इंग्रजांविरुद्ध जनमत तयार केले, असे प्रतिपादन वाडेकर नॅशनल स्कूलचे सचिव डॉ. रघुनाथ वाडेकर यांनी केले. लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत…

Read More

42 लाखांच्या एमडीसह शहरातून एकाला अटक:50 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त‎

शहरातील पाटीपुरा परिसरात राहणारा एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात एमडी (मेफेड्रोन) विक्रीसाठी आणत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी उशिरा रात्री सुरू करण्यात आलेल्या सुमारे पाच तासांच्या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी २१४ ग्रॅम एमडी, एक चारचाकी वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या एमडीची…

Read More

"इस्तीफा दो…’च्या घोषणांमुळे दणाणले रस्ते‎:काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर‎

दिल्ली येथील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठी हल्ल्याचे आज, गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही अमरावतीत पडसाद उमटले. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी धरणे, निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली. “धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो…’ विद्यार्थीयोंको न्याय दो…नरेंद्र मोदी हटाव-देश बचाव…अशा संतप्त आणि जोशपूर्ण घोषणांनी शहरातील जयस्तंभ चौक व संपूर्ण मार्केट परिसर दणाणून गेला होता. वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,…

Read More

साईबाबांच्या समाधीवर बसले अभिनेते संजय मिश्रा:ग्रामस्थ आक्रमक,‎पालकमंत्री विखे पाटलांचे‎चौकशीचे आदेश‎

श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साईबाबांची भूमिका साकारणारे अभिनेते संजय मिश्रा श्री साईबाबांच्या समाधीवर बसल्याचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याने शिर्डीसह देश-विदेशातील साईभक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. परंपरेनुसार समाधीवर पुजाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही बसण्यास मनाई असताना, या चित्रीकरणाला परवानगी दिलीच कशी? असा सवाल विचारला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याची चर्चा असल्याने संस्थानच्या…

Read More

यूपीत गंगा, यमुनासह 10 नद्यांना पूर:गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका; बिहारच्या 19 जिल्ह्यांना पावसाचा इशारा

संपूर्ण देशात मान्सूनचा पाऊस सुरू आहे. दक्षिण गुजरातमधील मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. उमरगाम तालुक्यात 16 तासांत 43 इंच पाऊस झाला. त्यामुळे सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी राज्याच्या 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यूपीमध्ये गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगा, यमुना यासह 10 नद्या दुथडी भरून…

Read More

मौनं सर्वार्थ साधनम्…:दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला‎ मौन धारण करून अण्णांचा पाठिंबा‎

गांधीवादी विचारांवर विश्वास ठेवणारे अण्णा हजारे यांनी अनेक आंदोलनांत उपोषण, सत्याग्रह आणि मौन या अहिंसक मार्गांचा अवलंब केला आहे. त्यांच्यासाठी मौन म्हणजे निष्क्रियता नव्हे, तर व्यवस्थेच्या संवेदनांना जागवण्याचे प्रभावी साधन आहे. आवाज वाढविण्याऐवजी शांततेतून संदेश देण्यावर त्यांचा भर राहिला आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अण्णांनी बुधवारी मौन धारण करून पाठिंबा दर्शवला. आंदोलनकर्त्यांनी…

Read More