विवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची फसवणूक:साडेचार लाखांची फसवणूक, चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल
पुण्यात विवाहाचे आमिष दाखवून एका संगणक अभियंता तरुणीची ४ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडित तरुणी वडगाव शेरीतील सोमनाथनगर येथे राहते. ती एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत आहे. तिने एका विवाहविषयक संकेतस्थळावर आपली नोंदणी…