Headlines

चोपड्याजवळील पार उमर्टी गावात पहाटे छापा:दाेघांना अटक, 400 पोलिसांच्या फौजेचे ‘कोम्बिंग’, 2 कट्टे, 4 काडतुसे, 32 गाड्या जप्त

चोपड्याजवळील पार उमर्टी (मध्यप्रदेश) गावात 400 पोलिसांच्या फौजफाट्याने मंगळवारी पहाटे 4 वाजेपासून चार तास ऑपरेशन कोम्बिंग सर्च राबवत बेकायदेशीर शस्त्र निर्मिती व तस्करीविरोधात धडक कारवाई केली. यात 2 देशी कट्टे, 4 जिवंत काडतुसे, शस्त्र निर्मितीचा कच्चा माल, 32 निनावी व महाराष्ट्र पासिंगच्या मोटारसायकली जप्त केल्या. पार उमर्टीतून (ता. वरला, जि. बडवानी) दोन संशयितांना अटक केली…

Read More

दोन पत्नींसोबत 3-3 दिवस राहणार पती:पत्नीने भाजी सुकी भाजी न केल्याने पतीने बोलावले पोलिसांना; माणसांपेक्षा वेगाने धावणारा कोळी

उत्तर प्रदेशमध्ये दोन लग्न केलेल्या एका व्यक्तीने आठवड्यातून तीन दिवस पहिल्या पत्नीसोबत आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. बदायूंमध्ये एका व्यक्तीने पत्नीने बनवलेल्या जेवणाची तक्रार घेऊन पोलिसांपर्यंत धाव घेतली. तर, वैज्ञानिकांनी असा कोळी शोधला आहे, जो माणसांपेक्षाही वेगाने धावतो. ऑस्ट्रेलियामध्ये एका महिलेने एकाच वेळी चार मुलींना जन्म दिला. आता ती 10 सीटर…

Read More

Maharashtra Leaders Pay Tribute To Ajit Pawar On Birth Anniversary

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांची आज पहिली जयंती आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आजही कायम आहे. आज दादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवा . नेत्यांनी दादांसोबतच्या आठवणींना दिला उजाळा अजितदादांचा कडक स्वभाव, सकाळी ६ वाजता सुरू होणारी त्यांची कार्यशैली आणि शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची ओळख…

Read More

4.65 लाख विद्यार्थ्यांचा पोषण आहार सुरू:पाच महिन्यांनंतर शाळांचा पुरवठा सुरळीत, करार विलंबामुळे शाळांवर उसनवारीची वेळ

मधल्या सुट्टीची घंटा वाजली की खिचडीच्या वासाने भरून जाणारे शाळेचे अंगण यंदा मात्र अनेक दिवस शांतच राहिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३,१६५ शाळांमधील ४ लाख ६५ हजार ८६२ विद्यार्थ्यांचा ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेअंतर्गत मिळणारा पोषण आहार . फेब्रुवारीत आलेला साठा संपल्यानंतर नवीन पुरवठा वेळेत झाला नाही. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी धान्य पुरवठ्याचा…

Read More

पिके धोक्यात:गव्हाली परिसरामध्ये पावसाची दडी‎, एकसारखा पाऊस न झाल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली‎

गव्हाली गव्हाली परिसरात खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, सिल्लोड एकूण ९९ हजार ८७ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी तब्बल ९३ हजार ७९५ हेक्टरवर ९४.६६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके कोमेजून करपू लागली आहेत. त्यामुळे या परिसरातील बळीराजावर पुन्हा एकदा दुबार पेरणीचे मोठे संकट उभे…

Read More

राहुल गांधींचे धरणे, डिटेंशन सेंटरमधून जारी केला VIDEO:प्रधान, शहांचा मागितला राजीनामा; नीट पेपरफुटीवर आज संसदेत चर्चा?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज बुधवार तिसरा दिवस आहे. लोकसभा आणि राज्यसभेत आज नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यासंदर्भात मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. याशिवाय, त्यांनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून धरणे आंदोलनही केले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि 3 तासांनंतर रात्री 9 वाजता सोडून…

Read More

राज्यात पुन्हा मुसळधार:पुणे, नाशिक, कोकणासह विदर्भातही जोरदार पावसाचा अलर्ट, मराठवाड्यातही पावसाची शक्यता

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. आज हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, मुंबईत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, ठाणे, पालघर, रायगडसह…

Read More

मूर्तिजापूर तालुक्यातील 15 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत:विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात;”पांढऱ्या कागदावर काळा खेळ’ सुरू असल्याचा प्रशासनावर ग्रामस्थांकडून आरोप‎

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, १५ शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. कागदोपत्री दुरुस्ती, देखभाल व विकासकामे पूर्ण झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. . तालुक्यातील भटोरी शाळेतील विद्यार्थी भिंतीला तडे गेलेल्या वर्गखोल्यांमधे बसून शिक्षण घेत आहेत. गत ५० ते ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या व…

Read More

सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण:77,100 वर व्यवहार सुरू, निफ्टीतही 100 अंकांची घसरण; आयटी, बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच २२ जुलै रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३०० अंकांनी अधिक घसरणीसह ७७,१०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे १०० अंकांची घसरण आहे, तो २४,१०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये आज जास्त विक्री आहे. आशियाई बाजारात आज संमिश्र व्यवहार २१ जुलै रोजी अमेरिकन बाजारात वाढ झाली होती…

Read More

नगरसेवक नीलेश देव यांचे आंदोलन स्थगित:मागण्यांवर निर्णय घेण्याचे मनपाचे आश्वासन‎

नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक नीलेश देव यांनी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून महानगरपालिका मुख्यालयाजवळ सुरू केलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन रात्री स्थगित केले. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आंदोलनातील सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची हमी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. दिवसभर विविध राजकीय, सामाजिक व नागरिक क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट…

Read More