Headlines

मांजरीतील सराफी पेढीची भिंत फोडून चोरी:30 तोळे सोने, चांदी आणि रोकड लंपास; आरोपींचा शोध सुरू

मांजरी बुद्रुक येथील मुंढवा रोडवर असणाऱ्या म्हसोबा वस्ती परिसरात एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोठी रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी, १२ जुलै २०२६ च्या रात्री ही घरफोडी झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मांजरी…

Read More

दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद:सहा आरोपी अटकेत, 14.87 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकूण 20 गुन्हे उघडकीस

पुणे ग्रामीण पोलिसांनी ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीतील सहा जणांना अटक केली आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार हत्यारे आणि चोरीची बोलेरो जीप असा एकूण १४ लाख ८७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणामधील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी आणि वाहनचोरीचे एकूण २०…

Read More

मराठी भाषा येत नसल्याने ओडिशातील आरोपीला जामीन:नागपूर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, नेमके काय होते प्रकरण?

अंमली पदार्थ प्रकरणातील ओडिशा येथील एका आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीला मराठी भाषा येत नसल्याने, त्याच्या घटनात्मक हक्कांचे उल्लंघन होऊ नये यासाठी न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया आणि तांत्रिक बाबींपेक्षा नागरिकांच्या घटनात्मक हक्कांना अधिक प्राधान्य दिले. ओडिशातील या आरोपीवर नागपूरमध्ये अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतरच्या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान,…

Read More

सातारा DPDC बैठकीत विकासापेक्षा महायुतीच्या केमिस्ट्रीचीच चर्चा:उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंची मिश्कील जुगलबंदी, गोरे-मोहिते वादाचेही पडसाद

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) सोमवारी झालेल्या बैठकीत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ७०२ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी मिळाली. मात्र विकासकामांच्या आढाव्यापेक्षा महायुतीतील नेत्यांचे एकाच व्यासपीठावर झालेले शक्तिप्रदर्शन, निधी वाटपावरील चर्चा आणि परस्परांतील हलक्याफुलक्या टोलेबाजीनेच बैठकीची अधिक चर्चा रंगली. पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री…

Read More

Sengaon Kolsha College Assault Case; President Booked For Attacking Parent

सेनगाव तालु्क्यातील कोळसा येथे बी फार्मसी महाविद्यालयात मुलीची टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संस्थाध्यक्षासह तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १३ गुन्हा दाखल झाला आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालु्क्यातील पोटा येथील गजानन जाधव यांची मुलगी अंजली ही सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर बी फार्मसी…

Read More

नागालँडमध्ये IED स्फोट, आसाम रायफल्सचा जवान शहीद:इतर चार जखमी, सुरक्षा कर्मचारी नियमित हालचाली करत होते; तेव्हा वाहन उडवले

नागालँडमध्ये शोखुवी-चुमौकेदिमा रस्त्यावर संशयित इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (IED) स्फोटात आसाम रायफल्सचा एक जवान शहीद झाला आणि चार इतर जखमी झाले. कोहिमा येथील संरक्षण जनसंपर्क अधिकारी (PRO) यांनी सांगितले की, स्फोट सोमवारी नागालँडच्या चुमौकेदिमा जिल्ह्यातील सुखोवी (शोखुवी) जवळ झाला. येथे आसाम रायफल्सचे मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. आधीच लावलेल्या IED ने आसाम रायफल्सच्या वाहनांच्या ताफ्याला लक्ष्य केले,…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्फोट?:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान; ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस

दिवंगत नेते अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला पक्षातूनच मोठा सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीलाच आव्हान दिले आहे. या अत्यंत अनपेक्षित कायदेशीर पवित्र्यामुळे…

Read More

2020 दिल्ली दंगल-माजी आप नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासह 5 दोषी:आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण; 6 आरोपी निर्दोष

दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयाने 2020 मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीदरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी 6 वर्षांनंतर निकाल दिला आहे. न्यायालयाने आम आदमी पक्षाचे (आप) माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासह पाच आरोपींना दोषी ठरवले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांच्या न्यायालयाने 11 आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या प्रकरणात सोमवारी निकाल दिला. न्यायालयाने नाझिम, काशिम, अनस, जावेद आणि…

Read More

काँग्रेसच्या बंडखोर गटाला बघेल यांचा धक्का:म्हणाले- पंजाबमध्ये एकच चेहरा असेल, राहुल गांधींचा; चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवण्याची मागणी फेटाळली

काँग्रेस प्रभारी भूपेश बघेल यांनी पंजाबमधून परत येताच बंडखोर गटाला स्पष्ट उत्तर दिले आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना मुख्यमंत्री चेहरा बनवण्याची मागणी त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. बघेल यांनी सोशल मीडिया (X) वर स्पष्ट लिहिले की, पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाचा एकच चेहरा आहे, तो म्हणजे राहुल गांधी. काँग्रेसच्या बंडखोर गटासाठी हा मोठा धक्का आहे. यापूर्वी…

Read More

माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन:राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा, शरद पवारांचे होते विश्वासू

पुण्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ गेनबा मोझे यांचे सोमवारी (१३ जुलै) अल्पशा आजाराने निधन झाले. ते जुन्या बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधी होते. त्यांच्या निधनामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर संगमवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामभाऊ मोझे हे…

Read More