Headlines

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंना रुग्णालयातून डिस्चार्ज:आज कोर्टात हजर करणार; दोन डॉक्टरांचे राजीनामे, निलंबनाची मागणी जोरात

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना थेट कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत ते कळवा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यापूर्वी रमेश…

Read More

नाशिकच नाही, संपूर्ण राज्यातील अनेक नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत येणार:उदय सामंतांचा मोठा दावा, खडसे-तावडे भेटीवरही केले भाष्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच ‘मेगा इन्कमिंग’ पाहायला मिळणार आहे, असा अत्यंत मोठा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. केवळ नाशिक महानगरपालिकाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील विद्यमान आणि माजी नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. याचवेळी, राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या…

Read More

लोकांनी महायुतीविरोधात निवडून दिलंय, मग खासदार अस्वस्थ का?:2029 मध्ये देशात 'इंडिया' आघाडीच सत्तेत येणार- संजय राऊत

आमच्या पक्षातून किंवा शरद पवारांच्या पक्षाकडून निवडून आलेल्या खासदारांना लोकांनी महायुतीच्याविरोधात निवडून दिले आहे. मग त्यांनी अस्वस्थ का व्हावे? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार गटातील 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, पंतप्रधान मोदी आणि शहा त्यांच्यामागे लागले आहेत ते खासदार काय करतील सांगता येत नाही या पृथ्वीराज चव्हाण यांच्या…

Read More

महाड मुख्याधिकारी मारहाण प्रकरण तापलं:अबू आझमींकडून 'सत्तेचा माज' आल्याची टीका, मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या- महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात झालेल्या कथित मारहाण प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. याप्रकरणी भाजप नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एका व्यक्तीविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवर विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून कठोर कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी…

Read More

न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी ९ जुलै २०२६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले असून, या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावेही जोडले आहेत. “न खाऊंगा,…

Read More

शरद पवारांचे 5-6 खासदार अस्वस्थ:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ! खासदार बजरंग सोनवणे आणि शशिकांत शिंदेंनी दिलं थेट उत्तर

राज्याच्या राजकारणात सध्या फोडाफोडीच्या आणि नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 5 ते 6 खासदार सध्या अस्वस्थ आहेत आणि ते काय करतील हे सांगता येत नाही,” असे विधान चव्हाण…

Read More

नाशिक धर्मांतर प्रकरण:गर्भवती TCS कर्मचारी निदा खानला जामीन मंजूर; न्यायालयाने दिला भगवान श्रीकृष्ण जन्माचा दाखला

नाशिक येथे धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात आरोपी असलेल्या माजी टीसीएस कर्मचारी निदा खानला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने नमूद केले की, निदा पाच महिन्यांची गर्भवती असून तुरुंगात बाळाला जन्म देण्याचा मानसिक आघात कोणत्याही महिलेसाठी असह्य असतो. भगवान कृष्णाच्या जन्माचा दाखला दिला न्यायालयाने तुरुंगात झालेल्या भगवान कृष्णाच्या जन्माचाही दाखला दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के….

Read More

Nifty Up 200 Pts, Sensex 700 Pts; IT & Metal Lead Rally

Marathi News Business Indian Stock Markets Surge: Nifty Up 200 Pts, Sensex 700 Pts; IT & Metal Lead Rally मुंबई2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच शुक्रवार, 10 जुलै रोजी सेन्सेक्स 700 अंकांनी (0.95%) वाढून 77,500 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 200 अंकांची (0.90%) वाढ झाली असून, तो 24,150 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात आयटी आणि…

Read More

राघव जुयालच्या बर्थडे पार्टीत पोहोचला आर्यन खान:सेल्फी काढण्याच्या नादात चाहता पडला, शाहरुखच्या मुलाने त्वरित पुढे होऊन मदत केली

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गुरुवारी रात्री डान्सर-अभिनेता राघव जुयालच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला. आर्यनला पाहताच चाहत्यांची गर्दी जमली. लोकांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक चाहता पडला, त्यानंतर आर्यन पुढे सरसावला आणि त्याला लगेच उचलून सावरले. त्याची ही कृती सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहते आर्यनच्या साधेपणाचे आणि मदत करण्याच्या स्वभावाचे कौतुक करत…

Read More

स्वतःचे दागिने, वाडा विकून 'मिसिंग लिंक' बांधलाय का?:हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात; भ्रष्टाचारावरून थेट नार्को टेस्टचे आव्हान

‘मिसिंग लिंक’वरून सध्या राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पावसाळी अधिवेशनात या प्रकल्पांवरून टीका झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता यावरून काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांवर अत्यंत टीका केली आहे. “मिसिंग लिंक मीच बांधला, असा फडणवीसांचा अहंकार आहे; पण त्यांनी स्वतःची शेती किंवा कुटुंबातील दागिने विकून हा प्रकल्प बांधलेला…

Read More