आर्थिक फटका:‘बुस्टर’ कंपनीचे ‘हुतूतू’ सोयाबीन बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत, कृषी विभागाने घेतली आंदोलनाची दखल
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी करूनही उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या तक्रारीनंतर अखेर कृषी विभागाने बुस्टर कंपनीच्या ‘हुतूतू’ सोयाबीन बियाण्यांचे नमुने अधिकृत तपासणीसाठी प्रयोगशाळेत रवाना केले आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित बियाण्यांच्या उगवणीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्यानंतर ८ जुलै रोजी निर्भय कृषी मंदिर कृषी सेवा केंद्र मोर्शी येथील सोयाबीन बियाण्यांचे नमुने गुणनियंत्रण अधिकारी दिनेश…