तीस दिंड्या अन् हजारो वारकऱ्यांसह ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला सुरुवात:नेवाशातून पालखी सोहळा मार्गस्थ, नेवासेत पहिला रिंगण सोहळा
संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी पालखी दिंडीचे बुधवारी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरचा हा पहिलाच पालख . दिंडीचे नेतृत्व ज्ञानेश्वर मंदिराचे देविदास महाराज म्हस्के, ह.भ.प. रामभाऊ राऊत आणि राम महाराज झिंजुरके यांनी केले. प्रस्थानापूर्वी माऊलींच्या पादुकांचे व पैस खांबाचे पूजन भास्करगिरीजी…