पुण्यात 8 ते 11 जुलैदरम्यान जड वाहनांना प्रवेशबंदी:पालखी सोहळ्यानिमित्त जुना मुंबई-पुणे महामार्ग 9 जुलैला बंद
संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या ९ जुलै रोजी पुणे शहरात एकत्र येत आहेत. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होणार असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने विशेष वाहतूक व्यवस्थापन लागू केले आहे. वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप…