मोहोळमध्ये 50 वाहन चालकांवर कारवाई:वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून 39,500 रुपयांचा दंड वसूल, पार्किंगबाबत सूचना
मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार हे सेवानिवृत्त झाल्याने सदर ठिकाणी पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांची नियुक्ती झाली आहे. मोहोळ पोलिस स्टेशनचा पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोहोळ शहरातील वाहतुकीसह रस्त्यावर होणारा अतिक्रमणाचा अडथळा दूर करण्यास सुरुवात केली आहे. सोमवार, दि. ६ जुलै रोजी केलेल्या कारवाईमध्ये ५० वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ३९,५०० रुपयांचा दंड…