Headlines

महाराजस्व अभियान:सहा दिवसांत 3,436 महिलांना मिळाला शेतकऱ्याचा दर्जा, नागपूर विभाग राज्यभरात अव्वल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना’ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या पहिल्या सहा दिवसांत महसूल विभागाने ऐतिहासिक पाऊल उचलत तब्बल ३,४३६ महिलांच्या नावे जमिनीची नोंद करून त्यांना ‘शेतकरी’ पदाचा अधिकृत दर्जा बहाल…

Read More

ऑर्केस्ट्राच्या परवान्याआडून चालणारी डान्स बारमधील छमछम आता बंद होणार:पावसाळी अधिवेशनात विधेयक मंजुरीनंतर गृह विभागाचा निर्णय

डान्स बारविरोधी कायद्यातील अटींना बगल देत ऑर्केस्ट्रा परवान्यांचा गैरवापर करणाऱ्या बारचालकांना राज्य शासनाने दणका दिला आहे. गृह विभागाने २७ जुलै रोजी परिपत्रक काढून नवे ऑर्केस्ट्रा परवाने देण्यावर आणि जुन्यांच्या नूतनीकरणावर पूर्ण बंदी घातली आहे. नियम दोनदा मोडल्यास दंड व निलंबन, तर तिसऱ्यांदा परवाना कायमस्वरूपी रद्द होऊन फौजदारी गुन्हा दाखल होईल. ऑर्केस्ट्राच्या नावाखालील अश्लील नृत्ये रोखण्यासाठी…

Read More

The country won a total of five medals at the Commonwealth Games, Sambhajinagar’s runner Tejas Shirse reached the final of the 110m hurdles

Marathi News International The Country Won A Total Of Five Medals At The Commonwealth Games, Sambhajinagar’s Runner Tejas Shirse Reached The Final Of The 110m Hurdles ग्लासगो9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक छत्रपती संभाजीनगरचा युवा धावपटू तेजस शिरसे राष्ट्रकुल स्पर्धेच्या ६० वर्षांच्या इतिहासात ११० मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारा पहिला भारतीय ठरला आहे. सोमवारी आयोजित हीट-१…

Read More

शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये भाजप नेता संजय गरुड सोलापुरातून ताब्यात:15 शाळांचा संचालक, आज काेर्टात हजर करणार

राज्यात खळबळ उडवणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीचा भाजप नेता व १५ शाळांचा संचालक संजय गरुड याला सोलापूरजवळील नातेपुते येथून सोमवारी ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. गरुड याने संस्थेतील १७७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी एकाच दिवसात तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संशयास्पद…

Read More

कोल्हापूर, सांगलीसाठी 3,200 कोटींचा आराखडा:सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती, नागरिकांना दिलासा

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या पुराच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३,२०० कोटी रुपयांच्या पूर व्यवस्थापन मोहिमेची घोषणा केली. महाराष्ट्र रिझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश पावसाच्या पाण्याची साठवणूक वाढवणे आणि कृष्णा व पंचगंगा नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवणे हा आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये फडणवीस…

Read More

चंदीगड न्यायालयात दीपके-वांगचुक, कामरा यांच्यावर FIR ची मागणी:वकिलाची याचिका- जंतर-मंतरवर CJP च्या आंदोलनात अपमानकारक टिप्पणी केली

कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर, चंदीगडमध्ये पर्यावरणवादी सोनम वांगचुक, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात चंदीगड न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी (CJM) यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत तिघांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे वकील विभु…

Read More

पेट स्कॅन चाचणी आता 3 हजारांत:शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करुग्णांना मोठा दिलासा

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात ‘पेट स्कॅन’ चाचणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. आता कर्करुग्णांना १५,४८७ रुपयांऐवजी केवळ ३,००० रुपये मोजावे लागतील. वैद्यकीय शिक्षण सचिवांच्या सूचनेनुसार हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला असून, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी ही माहिती दिली. पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर ही सुविधा २ जुलैपासून सुरू झाली…

Read More

नागपुरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना!:भरधाव कारच्या धडकेत 3 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, चालकाला अटक

नागपुरात काळजाचा ठोका चुकवणारी आणि अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मनिषनगर परिसरातील आश्रय सोसायटीजवळ एका भरधाव कारने तीन वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात या लहानग्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे….

Read More

शांतिनिकेतन कॉलनीत नगरसेविकेचे पती, महावितरण कर्मचाऱ्यांत वाद:पडलेल्या झाडामुळे प्रभावित झालेला वीज प्रवाह सुरळीत करतानाची घटना

अमरावती येथील पालखी रोडवरील शांतिनिकेतन कॉलनीत वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामादरम्यान महावितरणचे कर्मचारी आणि स्थानिक नगरसेविकेचे पती प्रशांत जाधव यांच्यात वाद झाला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता आणि दुरुस्तीचे काम थांबले होते. रात्री उशिरा जोरदार वाऱ्यामुळे शांतिनिकेतन कॉलनीतील एक मोठे कडुलिंबाचे झाड कोसळले. यामुळे एका घराची भिंत आणि एका कारचे मोठे नुकसान झाले….

Read More

E-20 पेट्रोलवर पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांची मागणी: गडकरी आणि पुरी यांना बडतर्फ करा

उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (ई-20) धोरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी या धोरणाला “अत्यंत अयशस्वी”, “भ्रष्टाचाराने ग्रासलेले” आणि “ग्राहकांवर आर्थिक भार टाकणारे” असे म्हटले आहे. यासोबतच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांना…

Read More