‘कंत्राटीं’ना दिलासा देण्याचा प्रयत्न; 47 कामगारांची सेवा अटींवर बहाल!:अपात्र तरी मानवतेच्या दृष्टीने अनुभव लक्षात घेता मिळाली संधी
. सुरक्षेसह, सुविधा नियमितपणे मिळाव्यात या उद्देशाने मनपातील ६५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना अस्थायी आस्थापनेवर आणण्याचे प्रयत्न मनपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केले आहेत. कारण, गेल्या १० ते १२ वर्षांपासून मनपाच्या विविध विभागात टंकलेखक तसेच संगणक ऑपरेटर पदावर कार्यरत ४७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता नसल्याने ते काम करण्यास पात्र नाहीत, असे कारण देत तत्काळ कामावरून कमी करण्यात आले…