लबाडी, फसवणूक आणि विश्वासघात हाच भाजपचा खरा DNA:विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही, असे आश्वासन देऊनही अवघ्या दोन दिवसांतच विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “लबाडी, फसवणूक आणि विश्वासघात हाच भाजपचा खरा डीएनए (DNA) असून, त्यांच्या या लबाडीचा योग्य वेळी इंच इंच हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा रोहित पवार…