सराफा दुकानातून दीड तोळ्याची सोन्याची अंगठी घेऊन भामटा फरार:गंगापुरात संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद
गंगापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या राजीव गांधी चौक परिसरातील ‘महेंद्र ज्वेलर्स’ या सराफा दुकानातून एका अज्ञात भामट्याने भरदिवसा चलाखीने सोन्याची अंगठी लांबवल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवारी (27 जुलै) दुपारी दोनच्या सुमारास ही चोरी झाली. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, घटनेनंतर काही तासांतच संशयित आरोपीला नेवासा पोलिसांनी ताब्यात घेऊन गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन केले…