जंतर-मंतरच्या धक्क्याने हिटलरशाही झुकली:बहुमताचा माज दाखवू नका, अन्यथा सत्तेतून बाहेर व्हावे लागेल, संजय राऊतांचा भाजपला इशारा
शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आणि देशाच्या राजकारणातील ‘पुराण पुरुष’ आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकून विचार केला असला, तरी सरकारला खरा धक्का जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानेच दिला आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, नीट पेपरफुटीमुळे देशभरात तब्बल 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कायद्याच्या राज्यात आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांवर गुन्हा…