वरुडा येथे 35 वर्षीय युवकाची शेतात आत्महत्या:कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले, कारण अस्पष्ट
तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरुडा गावात एका ३५ वर्षीय युवकाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. मनीष प्रकाशराव पाथरे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीष पाथरे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. सायंकाळ होऊनही ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शेतात जाऊन पाहिले. त्यावेळी…