सिंदखेडमधील जिजाऊ स्मारकाला ५० कोटींचा निधी:कामाला गती देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश, पर्यटन विकास महामंडळाद्वारे काम सुरू करणार
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५० कोटी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. जिजाऊंच्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सिंदखेड राजामधील या स्मारक आणि जिजाऊसृष्टीच्या कामासाठी २०२४ साली ५० कोटी जाहीर करण्यात आले होते. या निधीमधून सिंदखेडराजा जवळील जिजाऊसृष्टीचे काम सुरू करण्यात आले होते. आजवर…