दूध-बर्फ पुरवठादारांची तब्बल 3.68 कोटींची फसवणूक:सात संचालकांविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल
दूध आणि बर्फाचा पुरवठा करणाऱ्या 16 व्यावसायिकांची तब्बल 3 कोटी 68 लाख 52 हजार 859 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांविरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरगाव येथील ममता मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या डेअरीशी संबंधित संचालकांनी पुरवठादारांची बिले न देता त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप आहे. तसेच पैसे मागितल्यानंतर धमकी दिल्याचाही…