स्वातंत्र्य दिन विशेष: राज्य शासनाच्या धोरणाचे विदारक वास्तव:देशभरात शहिदांच्या वारसांना नोकरी; राज्यात मात्र 5 एकर जमीन मिळेना
देशातील तेलंगण, पंजाब, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालने शहिदांच्या वारसांना ‘विशेष बाब’ म्हणून थेट वर्ग-१ व वर्ग-२ च्या शासकीय पदांवर सामावून घेतले आहे. मात्र, महाराष्ट्रात आजही शहिदांचे वारस केवळ तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीच्या नोकरीसाठी आणि शासनाने जाहीर केलेल्या ५ एकर जमिनीसाठी लालफितीत अडकले आहेत. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या वारसांना विनाअट ५ एकर शेतजमीन देण्याचा ऐतिहासिक निर्णय…