औट्रम घाटाचे काम तातडीने पूर्ण करण्याची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी:खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांची दिल्लीत गडकरींशी भेट
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रखडलेले रस्ते प्रकल्प, वाढती वाहतूक कोंडी आणि महामार्गांच्या निकृष्ट कामांचा प्रश्न आता थेट केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दरबारात पोहोचला आहे. जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती मिळण्यासाठी खासदार संदिपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा…