Headlines

विद्यार्थी परिषद कार्यक्रम- ममता बॅनर्जींविरुद्ध गुन्हा दाखल:आरोप- निश्चित वेळेपेक्षा कार्यक्रम जास्त चालला; TMC समर्थकांनी रस्ता अडवला

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण 28 ऑगस्ट रोजी तृणमूल छात्र परिषद (TMCP) च्या कार्यक्रमाशी संबंधित आहे. आरोप आहे की, न्यायालयाने कार्यक्रमासाठी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंतची वेळ दिली होती. परंतु आयोजकांनी निर्धारित वेळेनंतरही कार्यक्रम सुरू ठेवला. तक्रारीनुसार, टीएमसी समर्थकांनी बॅरिकेड्स हटवले, पोलिसांशी धक्काबुक्की केली, कॅथेड्रल…

Read More

पुण्यात सर्वपक्षीय युवक संघटनांच्या प्रतिनिधींची अनौपचारिक भेट:राजकीय मतभेद कायम ठेवून वैयक्तिक द्वेष टाळण्यावर चर्चा

पुण्यात विविध राजकीय पक्षांच्या युवक संघटनांच्या प्रतिनिधींनी शनिवारी हॉटेल वैशाली येथे अनौपचारिक नाश्ता भेट घेतली. गेल्या काही महिन्यांपासून युवक संघटनांमध्ये निर्माण झालेले मतभेद, वाद आणि वाढलेली आक्रमकता यावर सकारात्मक संवाद साधणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी वैचारिक मतभेदांमुळे वैयक्तिक द्वेष निर्माण होऊ नये, यावर यावेळी एकमत झाले. या भेटीत…

Read More

इम्रान हाश्मीला झाला स्वाइन फ्लू:H1N1 चाचणी पॉझिटिव्ह; डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला, बघा एक्सक्लुझिव्ह मेडिकल रिपोर्ट

बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी स्वाइन फ्लू (H1N1) च्या विळख्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. अलीकडेच H1N1 ची चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. इम्रान हाश्मी गेल्या काही दिवसांपासून सतत प्रवास करत होते. ते रांचीलाही गेले होते. त्यांची तब्येत सतत बिघडत होती. तब्येत ठीक नसल्याने त्यांनी H1N1 ची चाचणी केली, ज्याचा अहवाल काल…

Read More

हर्सूलमध्ये ग्रीन झोनमधील अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई:मनपाचा सलग दुसऱ्या दिवशीही हातोडा, भूमाफियांचे धाबे दणाणले

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अनधिकृत प्लॉटिंगवर धडक कारवाई सुरू ठेवली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही हर्सूल भागातील ग्रीन झोनमधील बेकायदेशीर प्लॉटिंगवर जेसीबी चालवण्यात आला. या कारवाईमुळे शहरात अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. मनपाची कोणतीही परवानगी न घेता सुमारे 100 ते 110 एकर परिसरावर थाटलेले 1350 हून अधिक अनधिकृत प्लॉट या मोहिमेत उद्ध्वस्त करण्यात आले आहेत….

Read More

इथेनॉल मिश्रणावर सर्वोच्च न्यायालयात 31 ऑगस्ट रोजी सुनावणी:याचिकेत मागणी – पंपांवर सांगावे पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळले

सर्वोच्च न्यायालय 31 ऑगस्ट रोजी त्या जनहित याचिकेवर सुनावणी करेल, ज्यात देशातील सर्व पेट्रोल पंपांच्या नोजलवर आणि पेट्रोल बिलावर इथेनॉलची नेमकी मात्रा म्हणजेच टक्केवारी लिहिलेली असावी अशी मागणी केली आहे. पीटीआयनुसार, न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल. ही याचिका नरेंद्र कुमार गोस्वामी यांच्या वतीने दाखल करण्यात आली…

Read More

डॉक्युमेंटरी 'द लास्ट सॅल्यूट'मध्ये आलोक श्रीवास्तव यांची भावुक कविता:शरद केळकर यांनी आवाज दिला; यापूर्वी अमिताभ बच्चन यांनीही कवितेला आवाज दिला

नेटफ्लिक्सची ‘ऑपरेशन सफेद सागर’ ही मालिका सध्या जगभरात चर्चेत आहे. ही मालिका नेटफ्लिक्सच्या ग्लोबल टॉप 10 नॉन-इंग्लिश टीव्ही लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. यासोबतच आता याच्या निर्मात्यांनी मिग-21 ला समर्पित ‘द लास्ट सॅल्यूट’ ही डॉक्युमेंटरी रिलीज केली आहे. याची सुरुवात प्रसिद्ध कवी आलोक श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या कवितेने होते. या कवितेला अभिनेता शरद केळकर यांनी आपला…

Read More

जातिनिहाय जनगणनेत OBC साठी स्वतंत्र कॉलम हवा:अनिल देशमुखांची मागणी, म्हणाले- जरांगेंच्या आंदोलनावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी

राष्ट्रवादी ाँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच राज्यातील विविध प्रश्नांवरही देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर निशाणा साधला. विशेषतः जातिनिहाय जनगणना, ओबीसी समाजाची आकडेवारी, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन, आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन, नाशिकमधील…

Read More

Chhagan Bhujbal Opposes Manoj Jarange Demand; Caste Scrutiny Row

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून त्यांनी ‘जात पडताळणी समिती’ कायमची रद्द करण्याची मोठी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार आक्षेप घेतला आ . ‘जात पडताळणी समिती रद्द करणे धोक्याचे’ माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या…

Read More

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला रोहित पवारांची दांडी:शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले- विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही, लक्ष फक्त पक्षवाढीवर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक आज मुंबईत पार पडली. मात्र, या बैठकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते आमदार रोहित पवार यांच्या गैरहजेरीने. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसशी वाढलेली जवळीक आणि पक्षाच्या काही धोरणांपासून राखलेले अंतर यामुळे रोहित पवार यांच्या भूमिकेबाबत अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी…

Read More

‘एक नाही तर 100 गुन्हे दाखल करा, पण…’:शाळांमधील सुविधा द्या, सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा

राज्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था व अडचणी दाखवून देण्याचे काम आम्ही करीत आहोत. अडचणी दाखवून देण्यामुळे गुन्हा दाखल केला जात असेल तर एक नाही तर १०० गुन्हे दाखल करा, पण शाळा नीट करुन विद्यार्थ्यांना सुविधा द्या, अशी विंनती वजा इशारा कॉक्रोज जनतापार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शनिवारी ता. २९ शासनाला दिला आहे. हिंगोली तालुक्यातील लोहगाव,…

Read More