Headlines

महाराष्ट्रातील 106 प्रवाशांचा गट सुखरूप परतला:लोक म्हणाले- ज्या पुलावरून आलो, तो बुडाला; नेपाळमधून वाचवलेल्या लोकांची आपबिती

‘काठमांडूहून निघताच आम्हाला कल्पना आली होती की परिस्थिती अत्यंत धोकादायक झाली आहे. पाण्याचा प्रवाह अचानक वेगाने वाढला होता. आमच्या गाडीपासून सुमारे 500 मीटर अंतरावर पाहता पाहता एक कार पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. ते दृश्य पाहून आम्ही घाबरलो होतो.’ त्यावेळी वाटले की आता आमची पाळी आहे. आमची गाडीही पाण्यात वाहून जाऊ शकते. आम्हाला आशा नव्हती…

Read More

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न चिघळला:उईके-विद्यार्थ्यांमधील चर्चा निष्फळ, आज फडणवीसांसोबत बैठक

राज्यातील आश्रमशाळा, वसतिगृहे, शिष्यवृत्ती आणि नोकरभरतीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत आहे. नाशिक, पुणे, नागपूर, अमरावतीसह राज्यातील विविध भागांत विद्यार्थी आंदोलन करत असून, सरकारकडून चर्चा करूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यामुळे या बैठकीत आंदोलनावर तोडगा निघतो…

Read More

दगडूशेठ मंदिराजवळ महिलेचे दागिने चोरीला:83 हजार रुपयांचा ऐवज लंपास, विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातून एका ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून ८३ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर येथील ६३ वर्षीय ज्येष्ठ महिला दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिराच्या परिसरात मोठी गर्दी होती. याच…

Read More

शेवगावात मावा अड्ड्यावर छापा:18लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

शेवगाव येथील कोरडे वस्ती परिसरात मावा तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने २८ ऑगस्ट रोजी छापा टाकला. यात मावा बनवण्याची इलेक्ट्रिक मशीन, सुगंधीत तंबाखू, ८० किलो तयार मावा, सुपारीचा चुरा आणि दोन कार असा १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी मशीनवर मावा तयार करताना वसीम सत्तार तांबोळी (वय ३८, मूळ रा. श्रीरामपूर, हल्ली…

Read More

सुरक्षा बंध:एक हजारांवर शालेय विद्यार्थ्यांनी केला बालविवाह रोखण्याचा निर्धार

रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून पारनेर येथील अ.ए. सोसायटीच्या सेनापती बापट विद्यालयात स्नेहालय संचलित ‘उडान’ प्रकल्पाच्या वतीने ‘सुरक्षा बंध’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे १ हजार विद्यार्थ्यांनी बालविवाह रोखण्याचा आणि बहिणीच्या शिक्षणाला पूर्ण सहकार्य करण्याचा सामाजिक निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम म्हणाले, बहिणीचे खरे…

Read More

पुरुषांची मर्दानगी नारीचे रक्षण करण्यात:रामायण अभिनेता सुनील लहरी यांनी कृतीच्या वादग्रस्त रक्षाबंधन जाहिरातीच्या बहिष्काराचे समर्थन केले

कृती सेननच्या रक्षाबंधनशी संबंधित जाहिरातीत रिव्हिलिंग कपडे घातल्याबद्दल आता रामायण अभिनेता सुनील लहरी संतापले आहेत. त्यांनी या जाहिरातीवर बहिष्कार टाकल्याबद्दल कौतुक केले आणि याला संस्कृतीच्या विरोधात म्हटले. सुनील लहरी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘नमस्कार मित्रांनो, आपले सण, आपले उत्सव किंवा फेस्टिवल, आपण काहीही…

Read More

हिंगोलीच्या वसमतमध्ये फिल्मीस्टाईल अपहरण:घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवला, तरुणीला पळवले; चौघांवर गुन्हा

वसमत शहरातील एका भागात घरात शिरलेल्या चौघांनी एका कुटुंबातील व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन व घरातील रोख ९ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेऊन बंदुकीचा धाक दाखवून वीस वर्षीय तरुणीला पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २८ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून जप्त केलेली बंदूक…

Read More

कॅमेऱ्यात टिपले निसर्गाचे रंग:छायाचित्रण दिन साजरा

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘निसर्गातील छाया-कृती’ या आगळ्यावेगळ्या छायाचित्रण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निसर्गातील विविध सुंदर, मनमोहक आणि अनमोल क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले. फुले, पाने, आकाश, पक्षी, झाडे तसेच निसर्गातील विविध रमणीय दृश्यांचे विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने छायाचित्रण केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि…

Read More

वाढदिवसाच्या पार्टीनंतर रक्तरंजित थरार:वडिलांशी झालेल्या वादाचा राग, मुलाने मित्राच्या डोक्यात दगड घालून संपवले; गोंदियातील घटना

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपल्यानंतर झालेल्या वादातून 32 वर्षीय तरुणाचा दगडाने डोक्यात प्रहार करून खून करण्यात आल्याची घटना गोंदियात घडली. वडिलांशी झालेल्या धक्काबुक्कीचा राग मनात धरून त्यांच्या मुलाने तरुणावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना 28 ऑगस्टच्या मध्यरात्री अंगूरबगीचा रोडवरील मोहब हॉस्पिटलजवळ, एकदंत कॉलनी परिसरात घडली. या घटनेत मिथुन भैय्यालाल ठाकरे (32, रा. नवाटोला,…

Read More

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 3 ठार:ट्रकचालकाचा ताबा सुटला; 6 ते 7 वाहनांना उडवले

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडजवळ शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचा अचानक ताबा सुटल्याने त्याने पुढे जाणाऱ्या कार, ट्रकसह लहान-मोठ्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात तब्बल 6 ते 7 वाहने एकमेकांवर आदळली. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 2 ते 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 8 ते 10 जण जखमी झाल्याचे समोर आले…

Read More