पावसाची दडी, बळीराजा संकटात!:हातातोंडाशी आलेला घास गेला वाया; शेतकऱ्याने 10 एकर सोयाबीनवर फिरवला नांगर
राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके करपायला सुरुवात झाली असून परभणी जिल्ह्यातही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथे एका शेतकरी महिलेने पावसाअभावी वाळून चाललेल्या…