डीजे-लेझरमुक्त गणेशोत्सवाचा ‘पुणे पॅटर्न’ निर्माण करा:मेधा कुलकर्णींचा सवाल- ‘अंगविक्षेप कृष्णाला, गणपतीला आवडेल का?’
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणारा ‘पुणे पॅटर्न’ तयार करण्याची मागणी केली आहे. डीजे, प्लाझ्मा आणि लेझर लाईटसारख्या गोष्टींवर पूर्णपणे बंदी घालावी, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. कोणत्याही जाती-धर्माचा सण किंवा उत्सव असला तरी कायद्याची…