Headlines

फक्त पुण्यातील लोकच दारू प्याल्यावर गैरवर्तन करतात का?:कोर्टाचा सवाल, पुण्यात गणेशोत्सवातील 10 दिवस दारूबंदीचे आदेश अखेर मागे

मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी १० दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान दारूबंदी लागू केल्याबद्दल पुणे प्रशासनावर जोरदार टीका केली. मुंबई व इतर भागांवर असे निर्बंध नसताना केवळ पुणे जिल्ह्यालाच का लक्ष्य केले जातेय. फक्त पुण्यातील लोकच दारू पिल्यावर गैरवर्तन करतात का, असा सवालही हायकोर्टाने केला. मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने प्रशासनाला ही बंदी मागे…

Read Full News

बाप्पांच्या प्रसादासाठीच्या खिरापतीत खोबऱ्याच्या नावाने रव्याची भेसळ:गणेशोत्सवात खोबऱ्याच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा, भेसळीतून मिळवला जातो थेट 200 टक्के नफा

गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी खिरापत वाटली जाते. यासाठी बाजारात ‘खोबरे पावडर’ला सर्वाधिक मागणी असते. याचाच फायदा घेत स्वस्त ‘कोकोनट पावडर’ पाकिटांमध्ये ३० ते ४० टक्के रवा आणि पिठीसाखर मिसळवून ती विकली जात आहे. यासाठी श्रीलंकेत आणि दक्षिण भारतात नारळाचे तेल काढल्यानंतर उरलेली पेंड स्वस्त दरात मागवली जाते. त्यात नारळाचा सुगंध, रवा आणि पिठीसाखर मिसळून…

Read Full News

हाफिज सईदच्या नावावर 2 महिन्यांत दुसरे अजामीनपात्र वॉरंट:NIA कोर्टने जुलैमध्ये पहलगाम हल्ल्यासाठीही वॉरंट जारी केले आहे

जम्मू येथील एका विशेष NIA न्यायालयाने लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख आणि घोषित दहशतवादी हाफिज मोहम्मद सईद याच्याविरोधात नवीन अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्याच्यावर काश्मीर खोऱ्यातील सक्रिय दहशतवाद्यांना शस्त्रे, निधी आणि निर्देश दिल्याचा आरोप आहे. जम्मू NIA न्यायालयाने सईदविरोधात दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत जारी केलेले हे दुसरे अजामीनपात्र वॉरंट आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना शस्त्रे आणि इतर…

Read Full News

काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांनी अमित शहा यांना आवाहन केले:आतापर्यंत 3 धमकीची पत्रे मिळाली आहेत, यामध्ये नाव, पत्ता, गाडी नंबरपर्यंतचा उल्लेख

ऑल पीएम पॅकेज एम्प्लॉईज फोरम, काश्मीरने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे खोऱ्यात काश्मिरी हिंदू कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळत असलेल्या धमक्यांच्या प्रकरणात मदतीची याचना केली आहे. फोरमने म्हटले आहे की, गेल्या 16 वर्षांपासून काश्मीरमध्ये परत येऊन आपले जीवन पुन्हा सुरू करणारे कर्मचारी अलीकडे धमकीची पत्रे आणि धमकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे आपल्या सुरक्षिततेबद्दल अधिक चिंतित आहेत….

Read Full News

PM मोदी जागतिक नेत्यांसोबत डिनर करणार:मेन्यूमध्ये यूपीचे गलौटी कबाब, महाराष्ट्राची भाकरवडी आणि राजस्थानच्या कचोरीचा समावेश

नवी दिल्लीत 12 आणि 13 सप्टेंबर रोजी 18 वी ब्रिक्स (BRICS) लीडर्स समिट (शिखर परिषद) होईल. हे आयोजन भारत मंडपममध्ये केले जाईल. उद्या पंतप्रधान मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांचे यजमानपद भूषवतील. डिनरच्या मेन्यूमध्ये यूपीचे गलौटी कबाब, महाराष्ट्राची भाकरवडी आणि राजस्थानची कचोरी यांचा समावेश आहे. दरम्यान, आलिशान हॉटेल्समध्ये पाहुण्यांच्या स्वागताची तयारी अनेक…

Read Full News

मुंबई किनारपट्टीवर तटरक्षक दलाची मोठी कारवाई:तस्करी करणारे संशयित जहाज पकडले, बेकायदेशीर दारूसह 10 लाखांची रोकड जप्त

मुंबई किनारपट्टीजवळ तटरक्षक दलाने धडक कारवाई करत एका संशयित तस्करी करणाऱ्या जहाजाला पकडले आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी जहाजाची तपासणी केली असता त्यात बेकायदेशीर दारूचा साठा आढळून आला. याप्रकरणी बोटीवरील 6 क्रू मेंबर्सना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईची सुरुवात 10 सप्टेंबर 2026 रोजी…

Read Full News

गुजरात किनारपट्टीजवळ दोन व्यापारी जहाजांची धडक:21 लोकांची सुटका; कोस्ट गार्डचे बचाव अभियान सुरू

गुजरात किनारपट्टीवर, कांडला येथील ओटीबी अँकरेजजवळ दोन व्यापारी जहाजांची टक्कर झाली. या घटनेनंतर, तटरक्षक दलाने 21 लोकांना सुरक्षितपणे वाचवले आहे. तटरक्षक दलाच्या माहितीनुसार, जहाजांची नावे MV KMAX EMPEROR आणि MV TRUE MARINER अशी आहेत. दोन्ही जहाजांवर एकूण 24 लोक होते, त्यापैकी 3 लोकांना ऑपरेशन सांभाळण्यासाठी अजूनही MV KMAX EMPEROR जहाजावरच ठेवण्यात आले आहे. तटरक्षक दलाचे…

Read Full News

'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही':अवास्तव मागण्या कशा पूर्ण होणार? मंत्री गिरीश महाजनांचा जरांगेंना सवाल

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच, अंतरवाली सराटी येथे गेल्या 14 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जाहीर शिव्या देऊन या प्रश्नावर कोणताही मार्ग निघणार नाही,…

Read Full News

छोट्या कर्जदारांनाही 'ओटीएस'ची समान संधी द्या:महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

आर्थिक अडचणींमुळे कर्जाची परतफेड करू न शकणारे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक यांना न्याय्य वन टाईम सेटलमेंट (ओटीएस)ची समान संधी मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ ते १२ या वेळेत झालेल्या आंदोलनात समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते…

Read Full News

2019 मतदार ठरवणार सातारा जिल्हा बँकेचा सत्तासमीकरणाचा कौल:21 संचालकांसाठी पडद्यामागे मोर्चेबांधणी; सोसायटी मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणुकीतील प्रमुख आकडे स्पष्ट झाले असून, २१ संचालकांच्या निवडीसाठी २ हजार १९ मतदार पात्र ठरले आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा २२१ मतदार कमी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघनिहाय संख्येपेक्षा प्रत्येक मतदाराची राजकीय ‘किंमत’ वाढली आहे. विभागीय सहनिबंधकांकडे…

Read Full News