रोटरी क्लबचा उपक्रम:ढोरकीन जि. प. शाळेला प्रोजेक्टर संच व कंपोस्ट ड्रम भेट
सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोटरी क्लबच्या वतीने येथील जिल्हा परिषद हायस्कुलला डिजिटल शिक्षणासाठी एक प्रोजेक्टर संच, तर कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीसाठी दोन कंपोस्ट ड्रम भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळण्यासोबतच कचरा व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष धडे मिळणार आहेत. शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात हे साहित्य अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लबचे…