Headlines

दिंडोरी‎:कॅटलॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंबे दिंडोरी येथील धनश्री राठीचे यश

आंबे दिंडोरी सारख्या ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू धनश्री अनिल राठी हिने स्पेनमध्ये पार पडलेल्या ‘कॅटलॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा’ मालिकेत चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. ‘ माय स्पोर्ट ट्रिप इंडिया”चे अंकित दलाल यांच्यामार्फत ती या स्पर्धेत सहभागी झाली होती. ​स्पेनमधील पाच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये धनश्रीने एकूण १४४ रेटिंग पॉईंट्सची कमाई करत आपली एकूण रेटिंग…

Read Full News

शेतकऱ्यांना अर्धी रक्कम रोख देणार:लासलगाव बाजार समितीचे आश्वासन; ‘शहर विकास समिती’चे उपोषण मागे‎

शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीनंतर अर्धी रक्कम तात्काळ रोख स्वरूपात, तर उर्वरित रक्कम ऑनलाइन देण्याची प्रमुख मागणी अखेर मान्य झाली. यासह १३ मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर लासलगाव शहर विकास समितीने सुरू केलेले बेमुदत उपोषण शुक्रवारी (दि. ११) मागे घेण्यात आले. निफाड पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश पाटील व शेतकरी प्रतिनिधी उत्तम जगताप यांनी लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर…

Read Full News

दिंडोरी‎:वाघाड जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

वाघाड येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा येथे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणारा उपक्रम पार पडला. रामचंद्र मराठे व छाया मराठे यांनी आपले सुपुत्र स्वप्नील मराठे यांच्या नावे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांना वही, पेन, कंपास बॉक्सचे वाटप करण्यात आले. एलिमेंटरी चित्रकला परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बुक,…

Read Full News

सागरी जीवांच्या वेदना रंगमंचावर:‘व्यथा सागरी जीवांची’ विज्ञान एकांकीका अव्वल

महासागरातील प्रदूषण, प्लास्टिकचा वापर व मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेली सागरी जीवसृष्टी यांचे विदारक वास्तव प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘व्यथा सागरी जीवांची’ या विज्ञान एकांकिकेने लोहोणेर येथील जनता विद्यालयाला देवळा तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवून दिला. विज्ञान नाट्यसंघाने सलग पाचव्यांदा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात देवळा तालुक्यातील २६ शाळांनी सहभाग घेतला. ‘महासागराचे…

Read Full News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन:अभ्यासपूर्ण मांडणी, परखड भूमिका आणि पुरोगामी विचारांसाठी महाराष्ट्रात परिचित

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राजकीय विश्लेषक आणि समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन झाले आहे. अभ्यासपूर्ण मांडणी, परखड भूमिका आणि पुरोगामी विचारांसाठी ते महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात परिचित होते. संविधान, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समानतेच्या मूल्यांसाठी आयुष्यभर भूमिका घेणारा एक महत्त्वाचा वैचारिक आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. इंदापूर ते पुणे कर्मभूमी डॉ. महाजन हे…

Read Full News

बॉडी शेमिंगवर नीना गुप्तांनी दिले उत्तर:67 वर्षांची अभिनेत्री म्हणाली- 'कुणी विचारले तर सांगा की मी गरोदर आहे'

नीना गुप्ता यांनी नुकतेच बॉडी शेमिंग आणि लग्नाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर मजेशीर अंदाजात उत्तर दिले. CNN-न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, जेव्हा लोक त्यांना विचारत की त्यांचे लग्न का झाले नाही, तेव्हा त्या यावर काय उत्तर देत असत. यावर नीना म्हणाल्या, “मी तुझ्या बापाचे खात नाहीये ना, माझ्या बापाचे खातेय. तुला काय अडचण…

Read Full News

लोखंडी अँगल, पत्रा लागून 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू:शेंद्रा एमआयडीसीतील घटना: तिघांविरुद्ध गुन्हा‎

शेंद्रा एमआयडीसीतील ‘युनायटेड जेनेटिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत काम करताना लोखंडी अँगल व पत्रा डोक्याला आणि चेहऱ्याला लागून गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. अनिकेत गौतम सोनवणे (१९, रा. अहिल्यानगर; हल्ली रा. चिकलठाणा) असे मृत कामगाराचे नाव आहे. कंपनी प्रशासनाने सुरक्षेची कोणतीही साधनसामग्री न…

Read Full News

पुनर्वसनाशिवाय दुकाने हटविण्याला विरोध:चांदवड बाजारतळातील व्यावसायिकांचे उपोषण‎

शिवसृष्टी उभारण्यासाठी चांदवड बाजारतळ परिसरातील दुकाने हटविण्याची कारवाई प्रस्तावित असताना व्यावसायिकांच्या पुनर्वसनाची पर्यायी व्यवस्था अद्याप झालेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात कर्ज व उसनवारी करून दुकानांमध्ये माल भरलेल्या छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुकाने हटविण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था किंवा पुनर्वसन करावे, या मागणीसाठी व्यावसायिकांनी बुधवारपासून (दि. ९) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बाजारतळाच्या…

Read Full News

‘हनुमान अंश’च्या शूटिंगवेळी पोहोचले रहस्यमय वानर:मूर्ती स्थापना पाहत राहिले; भगवान दास म्हणाले- हनुमानजी स्वतःच देखरेख करत होते असे वाटले

चित्रपट ‘हनुमान अंश’ मध्ये गोपालची भूमिका साकारून अभिनेता भगवान दास पटेल सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूर ते मुंबईपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. थिएटरमध्ये सहा वर्षे घालवल्यानंतर त्यांनी टीव्ही आणि चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका केल्या. मुझसे फ्रेंडशिप करोगे, प्रेम रतन धन पायो, थार, रंगबाज आणि फोटोग्राफ यांसारख्या चित्रपट आणि मालिकांचा भाग असलेल्या भगवान…

Read Full News

ग्रामस्थांमध्ये संताप:जायखेड्यातील गैरव्यवहार चौकशीला विलंब; सटाणा पंचायत समितीत ठिय्या

प्रतिनिधी | सटाणा जायखेडा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार व आर्थिक अनियमिततेच्या चौकशीला विलंब होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बेमुदत उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणकर्ते बापूजी मोगरे यांची प्रकृती खालावल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. ११) बागलाण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, हा विषय तहसील कार्यालयाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर आंदोलकांनी पंचायत…

Read Full News