Headlines

चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची कामे वेगात:वाहतूक कोंडीवर उपाययोजना सुरू; राष्ट्रीय महामार्गावरील फोडलेले दुभाजक बंद करणार

चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने रस्ते आणि इतर सुविधांची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. अनेक रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृतपणे फोडलेले दुभाजक बंद करण्यासह वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी चाकण एमआयडीसी पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली….

Read Full News

प्रॉपर्टीच्या वादातून बेलतरोडीत गोळीबार:एका युवकाला गंभीर दुखापत, 6 आरोपींना काही तासांत अटक

नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोटाळ पांजरी येथे प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून एका युवकावर गोळीबार करण्यात आला. गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने काही तासांतच ६ आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता गोटाळ पांजरी येथील श्री स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर ही घटना घडली….

Read Full News

भरती परीक्षा सुधारणांसाठी विद्यार्थ्यांना थेट सहभागाची संधी:उच्चस्तरीय टास्क फोर्स 12 सप्टेंबरला सावित्रीबाई फुले विद्यापीठात उमेदवारांशी संवाद साधणार

राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. या समितीच्या माध्यमातून भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करण्यात येत असून, पुणे विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा आणि विषयतज्ज्ञांशी थेट संवाद साधण्यासाठी शनिवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी जिओलॉजी सभागृह, पहिला मजला, सावित्रीबाई फुले…

Read Full News

लंडनमध्ये विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट:'एवढा मोठा क्रिकेटपटू, पण अत्यंत साधा आणि नम्र', उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने लंडन दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या लंडन दौऱ्यात तीन मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या एकनाथ शिंदे आणि विराट यांच्यात यावेळी विविध विषयांवर दीर्घकाळ चर्चा झाली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना शिंदे यांनी या भेटीची सविस्तर माहिती दिली असून, यावेळी त्यांनी विराटचे भरभरून कौतुक…

Read Full News

गोरेगाव पोलिस ठाण्याचा जमादार एसीबीच्या जाळ्यात:3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; अदखलपात्र गुन्ह्यात जामीन मिळवून देण्याची घेतली लाच

गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत कडोळी येथे अदखलपात्र गुन्ह्यात जामीन मिळवून देतो तसेच विरोधी गटावर कारवाई करण्यासाठी तीन हजाराची लाच घेतांना गोरेगाव पोलिस ठाण्याच्या जमादारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ता. 11 सायंकाळी गोरेगाव ते खांबाळा चौफुली येथे रंगेहात पकडले. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत कडोळी…

Read Full News

साजापूरमध्ये महावितरणच्या उपकेंद्र कामात अडथळा:महिला अभियंत्याला धमकी, कलीम पठाणसह 5 जणांवर वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर येथील साजापूर सुरू असलेल्या महावितरणच्या विद्युत उपकेंद्राच्या कामात वारंवार अडथळे आणून महिला अभियंता व ठेकेदारास धमकावल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी कलीम चाँद पठाण व त्याच्यासोबतच्या चार ते पाच इसमांवर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. साजापूर येथील गट नं.44 मध्ये शासनाच्या महत्त्वाकांक्षी एमएसकेव्हीवाय-2.0 (मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना)…

Read Full News

पालघर रुग्णालय मारहाण प्रकरण:आमदार राजेंद्र गावित यांच्या मुलाला अटक; शिवसेना शिंदे गटाकडूनही निलंबनाची कारवाई

पालघरमधील रिलीफ रुग्णालयात दहीहंडीच्या दिवशी झालेल्या मारहाण प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पालघर पोलिसांनी मिरा रोड येथील जीसीसी क्लबमधून ताब्यात घेऊन अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून रोहित गावित फरार होता, अखेर पोलिसांना त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान पालघर येथील…

Read Full News

अलायन्स एअर विमानाची दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग:प्रयागराजहून येत होते विमान, इंजिनमध्ये बिघाड; 40 प्रवासी होते

अलायन्स एअरच्या एका विमानाचे इंजिन बिघडल्यामुळे दिल्ली विमानतळावर त्याची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. विमानात 40 प्रवासी आणि 4 क्रू सदस्य होते. विमान प्रयागराजहून दिल्लीला येत होते. विमानतळ सूत्रांनी सांगितले की, विमानाने आपत्कालीन लँडिंग केली, कारण त्याचे एक इंजिन काम करत नव्हते. विमान दुपारी सुमारे 2.15 वाजता दिल्ली विमानतळावर उतरले. दिल्लीला पोहोचण्यापूर्वी मागितली आपत्कालीन लँडिंग अलायन्स…

Read Full News

दिल्ली- 26 वर्षांच्या तरुणाच्या पोटात आढळले गर्भाशय:डॉक्टरांकडे वंध्यत्वाच्या उपचारासाठी पोहोचला होता; जगात अशी फक्त 300 प्रकरणे

दिल्लीतील 26 वर्षीय तरुणाच्या वंध्यत्वाच्या तपासणीत पोटाच्या आत गर्भाशय (युटेरस) आढळले आहे. दोन्ही अंडकोषही पोटाच्या आत होते. तो तरुण राजौरी गार्डन येथील आरजी हॉस्पिटल्समध्ये प्राथमिक वंध्यत्वावर उपचार घेण्यासाठी पोहोचला होता. तपासणीत त्याच्या वीर्यात शुक्राणू आढळले नाहीत. एमआरआयमध्ये पेल्विसच्या आत गर्भाशयासारखी रचना दिसली. डॉक्टरांच्या मते, ही पर्सिस्टंट म्यूलरियन डक्ट सिंड्रोम (PMDS) सारखी दुर्मिळ जन्मजात स्थिती असू…

Read Full News

मुंबईत बांधकाम कामगारांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन:बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्यांनी समन्वयाने काम करावे- डॉ. मनसुख मांडवीय

बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी सेवा आणि रोजगाराच्या संधी अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. विविध राज्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांतील उत्तम पद्धतींची देवाणघेवाण करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले. मुंबईतील हॉटेल ताज महल पॅलेस येथे इमारत…

Read Full News