चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला गणराया:साताऱ्यातील भारती फाउंडेशनच्या ‘आम्ही देऊ माती, तुम्ही बनवा गणपती’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
हातात शाडू माती, मनात बाप्पाची सुंदर प्रतिमा आणि ती प्रत्यक्षात साकारण्याचा उत्साह… अशा आनंदी वातावरणात भारती फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘आम्ही देऊ माती, तुम्ही बनवा गणपती’ या अनोख्या गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वतःच्या हातांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याचा आनंद मुलांनी यावेळी अनुभवला. सातारा शहरातील छत्रपती शाहू उद्यान, गुरुवार बाग येथे सकाळी आठ ते दहा…