'पीएमआरडीए'ला टाळे ठोकण्याची वेळ:महानगर नियोजन समितीचा आरोप; रखडलेला विकास आराखडा, वाहतूककोंडी आणि सुविधांच्या अभावावरून टीका
पुणे महानगराच्या नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात गेल्या 10-11 वर्षांत अपेक्षित प्रगती झालेली नाही. विकास आराखडा (डीपी), टीपी स्कीम, रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा अजूनही प्रलंबित आहेत. पुण्याच्या विकासात सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यपद्धतीवर आक्षेप आहे. या अकार्यक्षम यंत्रणेला टाळे ठोकण्याची वेळ आली आहे, असा आरोप महानगर…